Jammu Kashmir: बारामुल्ला आणि शोपियानमध्ये लष्कराकडून 4 दहशतवाद्यांना अटक

जम्मू आणि काश्मीर मधील बारामुल्ला आणि शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर- ए- तोएबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली
Jammu Kashmir: बारामुल्ला आणि शोपियानमध्ये लष्कराकडून 4 दहशतवाद्यांना अटक
Jammu Kashmir: बारामुल्ला आणि शोपियानमध्ये लष्कराकडून 4 दहशतवाद्यांना अटकSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: जम्मू आणि काश्मीर मधील बारामुल्ला (Baramulla) आणि शोपियान (Shopian) जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर- ए- तोएबाच्या ४ दहशतवाद्यांना (terrorists) अटक (Arrested) करण्यात आली आहे. पोलीस (Police) प्रवक्त्यांनी काल दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांसह पोलिसांनी (Police) प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर- ए- तोएबाशी संबंधित दहशतवाद्यांच्या २ साथीदारांना बारामुल्ला (Baramulla) येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दारूगोळ्याबरोबरच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Jammu Kashmir Army arrests 4 terrorists Baramulla Shopian)

हे देखील पहा-

खचदारी जेहानपोराचा अज्ञात दहशतवादी (Terrorist) गट बारामुल्लाच्या मुख्य भागात पोलीस आणि इतर सुरक्षा दलांविरुद्ध शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरिता अवैध शस्त्रे आणि दारूगोळा (Ammunition) वापरत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना (Police) माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत असताना, सुरक्षा दलांनी जेहानपोरा- खदनियार लिंक रोडबरोबरच अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती, असे प्रवक्त्यांनी सांगितली होते. तपासादरम्यान जेहानपोराच्या बाजूने एका स्कूटीवर २ लोक दिसले होते, जे संशयास्पद दिसून आले होते.

Jammu Kashmir: बारामुल्ला आणि शोपियानमध्ये लष्कराकडून 4 दहशतवाद्यांना अटक
Nawab Malik Arrested: "नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा", अन्यथा... - चंद्रकांत पाटील (पहा Video)

नाकेबंदी बघून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सतर्क पोलिसांच्या पथकाने दोघांना देखील पकडले आहे. त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडून एके ४७ रायफलच्या ४० राऊंड जप्त करण्यात आले आहे. इम्तियाज अहमद आणि मुनीर अहमद अशी त्यांची नावे असून ते खचदरी जेहानपोरा येथील रहिवासी आहेत, असे प्रवक्त्यांनी यावेळी सांगितले आहे. प्राथमिक चौकशीच्या दरम्यान, दोघांनी कबूल केले आहे, की ते लष्कर- ए- तोएबा या बंदी घातलेल्या संघटनेकरिता काम करत आहेत आणि दहशतवाद्यांसाठी बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा वाहतूक करत आहेत.

ज्याचा वापर पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी केला जातो. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांना शोपियानमधून अटक केली आहे. एका प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलीस अधिकार्‍यांना दहशतवाद्यांचे दोन सहकारी आकिब मुश्ताक लोन आणि अमीर अमीन सोफी यांच्या सहभागाची माहिती मिळाली. दोघेही लष्करशी संबंधित असून ते शडचेक भागातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com