पुणे: कॅबिनेट मंत्री म्हणून राहण्याचा नवाब मालिकांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. तुमच्या माध्यमातून मी ही मागणी करत आहे. आता कशाची वाट पहाताय? एक माजी मंत्री महिला अत्याचार प्रकरणी राजीनामा दिला आहे. एका मंत्र्याच्या २ बायका जे हिंदू कोड बिल मध्ये बसत नाही. मुंबई आयुक्त परमवीर सिंग यादी मोठीय, मला दम लागला. ज्या ज्या मंत्र्यांना अटक झाली. या सरकारने घटना पायदळी तुडवली याची 22 पानी नोट तयार आहे. उशिरा गेलो तर चांगली कोठडी मिळणार नाही, म्हणून जणू काही रांग लागली आहे. नवाब मलिकांची देहबोली- याला आमच्याकडे ग्रामीण भाषेत कोडगेपणा म्हणतात.
हे देखील पहा-
महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी (ED) भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाई करत आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सतत करत आहेत. महाविकास आघाडीनेही हीच भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुडाचे राजकारण सुरू आहे, म्हणत भाजपवर टीका करण्यात येत आहे. अशातच मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ईडी चौकशीने राजकारण तापवले आहे. यावर दोन्ही बाजुने आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप सुड्याच्या भावनेतून कारवाई करत आहे. असा आरोप महाविकास आघाडी करत आहे, तर नवाब मलिक दोषी नसतील तर त्यांनी कोर्टात जावं असे भाजप नेते सांगत आहेत. मात्र नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणारच, कारण जर मलिक डी गँगशी संबंध असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी गंभीर शंक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना 1 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आणि तिथे त्यांची तब्बल सात-आठ चौकशी केली. आता अधिक चौकशीसाठी नबाव मलिक यांना ईडीकडून अटक (Arrested) करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) मनी लॉड्रिंग प्रकरणी (Money laundering case) नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं असल्याचं समजले आहे.
काही दिवसांपुर्वी ईडीने इक्बाल कासकर आणि हसीना पारकर यांच्या घरावरही धाड टाकली होती. नबाब मलिकांना आता ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नवाब मलिकांनी एनसीबी आणि भाजपविरुद्ध आघाडी उघडली होती. मलिकांना स्वतः भाकित केलं होतं की, मला ईडीची धमकी देण्यात येत आहे, मला ईडी कारवाईचे संकेत देण्यात येत आहे, मलाही फसवण्याचा प्रयत्न होईल असं नवाब मलिकांनी आधीच सांगतिलं होतं. याशिवाय मलिकांवर पाळतही ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.