जम्मू- काश्मीर: भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी
जम्मू- काश्मीर: भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी Saam Tv

जम्मू- काश्मीर: भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी

जम्मू काश्मीरच्या नौशेरा सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच शनिवारी भूसुरुंग स्फोट झाला
Published on

वृत्तसंस्था : जम्मू काश्मीरच्या नौशेरा सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच शनिवारी भूसुरुंग स्फोट झाला. या स्फोटामध्ये २ जवान शहीद झाले आहेत तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त घालत असताना हा स्फोट झाला आहे ,आणि त्यात १ अधिकारी आणि १ जवान शहीद झाला आहे. माहिती मिळताच इतर जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी तिघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले जात आहे. तर या घटनेची एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील पुष्टी केली आहे. जम्मूच्या संरक्षण प्रवक्त्याकडून दिलेल्या माहितीनुसार, नौशेरा सेक्टर मधील परिसरात गस्त घालत असताना भुसुरुंग स्फोट झाला आहे, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे २ जवान गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा-

या घटनेमध्ये शहीद झालेले लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत बहादूर हे अतिशय शूर आणि मेहनती होते. या दोघांनी देशाकरिता बलिदान दिले आहे. या दोन्ही शूर जवानांच्या सर्वोच्च बलिदानासाठी देश आणि भारतीय लष्कर सदैव ऋणी राहणार आहे. दरम्यान, लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहार मधील बेगुसरायचे रहिवासी होते, तर शिपाई मनजीत सिंग सिरवेवाला हे पंजाब मधील भटिंडा या ठिकाणील रहिवासी आहेत,” असे त्यांनी सांगितले आहे.

जम्मू- काश्मीर: भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी
Beed : उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 4 वर्षीय चिमुकली ठार

काही दिवसाअगोदर दहशतवादी हल्ल्यात २ अधिकाऱ्यांसह ९ जवान शहीद झाले होते. दहशतवादी पुंछच्या जंगलात लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नौशेरा सेक्टरमध्ये मागील ३ आठवड्यांपासून लष्कराची शोध मोहीम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लष्कराचे जवान या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. मागच्या काही वर्षातील ही सर्वात मोठी चकमक आणि शोध मोहीम असल्याचे सांगितलं जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com