फेरमतदानात भाजपचा दारुण पराभव, काँग्रेसच्या जागा वाढल्या; सत्ता परिवर्तन होणार?

Jaipur Municipal Corporation Re-Polling Results: जयपूर महापालिका निवडणुकीतील फेरमतदानाचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेसने चारही वॉर्डमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या जागा 53 वरून 57 झाल्या, तर भाजपचे 78 जागांसह बहुमत कायम आहे.
JAIPUR MUNICIPAL ELECTION
JAIPUR MUNICIPAL ELECTIONsaam tv
Published On

जयपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या फेरमतमोजणीत 150 वार्डाचे निकाल स्पष्ट झाले आहेत. बुधवारी जयपूरमधील चार वार्डातील पाच बुथवर फेरमतदान घेण्यात आले होते. या फेरमतदानाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. रिपोलिंग झालेल्या सर्व काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे जयपूर महापालिका जागांची संख्याही वाढली आहे. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल 14 सप्टेंबर रोजी जाहीर झाले होते. मात्र, EVMमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जयपूर महापालिकामधील वॉर्ड क्रमांक 9, 18, 25 आणि 34 मधील मतमोजणी होऊ शकली नव्हती. यानंतर बुधवारी वॉर्ड क्रमांक 9 मधील बूथ क्रमांक 111, वॉर्ड 18 मधील बूथ क्रमांक 235, वॉर्ड 25 मधील बूथ क्रमांक 343 तसेच वॉर्ड 34 मधील बूथ क्रमांक 477 आणि 484 येथे फेरमतदान घेण्यात आले.

JAIPUR MUNICIPAL ELECTION
भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वॉर्ड क्रमांक 9 मधून काँग्रेसच्या कैलाशी यांनी 764 मतांनी विजय मिळवला. वॉर्ड क्रमांक 18 मध्ये काँग्रेसच्या विदिता शर्मा 181 मतांनी विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक 25 मधून काँग्रेसच्या रेखा देवी यांनी 397 मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर वॉर्ड क्रमांक 34 मध्ये काँग्रेसचे सुरेश यादव 149 मतांनी विजयी झाले. अशाप्रकारे फेरमतदान झालेल्या चारही वॉर्डमध्ये काँग्रेसने विजय मिळवत क्लीन स्वीप केला.

JAIPUR MUNICIPAL ELECTION
राजकीय वारं फिरलं? भाजप उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; कुटुंबीयांनीही नाकारलं

फेरमतदानानंतर काँग्रेसच्या जागा 57

राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील 309 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10,244 वॉर्डांचे निकाल 14 सप्टेंबर रोजी जाहीर झाले होते. यामध्ये भाजपने 4,179 वॉर्डमध्ये विजय मिळवला, तर काँग्रेसने 3,613 वॉर्ड जिंकले. 2,273 वॉर्डमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले. जयपूर महानगरपालिकेत एकूण 150 वॉर्ड असून बहुमतासाठी 76 नगरसेवकांची आवश्यकता आहे. रिपोलिंगपूर्वी भाजपकडे 78 जागा, काँग्रेसकडे 53 जागा आणि अपक्षांकडे 15 जागा होत्या. फेरमतदानानंतर काँग्रेसने चारही वॉर्ड जिंकल्याने तिच्या जागांची संख्या 53 वरून 57 झाली आहे. भाजपने 78 जागांसह बहुमत कायम राखले असून, अपक्ष उमेदवारांच्या 15 जागा कायम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com