राजकीय वारं फिरलं? भाजप उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; कुटुंबीयांनीही नाकारलं

Rajasthan Civic Election Result BJP Candidate Gets Only One Vote: राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परबतसर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 13 मध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजप उमेदवार कैलाशचंद यांना अवघे एक मत मिळाले, तर काँग्रेसच्या हिना खानम यांनी 376 मते मिळवत 181 मतांनी विजय मिळवला.
RAJASTHAN ELECTION RESULT
RAJASTHAN ELECTION RESULTsaam tv
Published On

राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यातील 309 नगरपालिकांमधील एकूण 10,167 प्रभागांपैकी आतापर्यंत 3657 प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने 1502 प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र परबतसर नगरपालिकेतील वार्ड क्रमांक 13 मध्ये भाजप उमेदवारासाठी धक्कादायक निकाल समोर आला आहे. या वॉर्डमधून भाजपचे उमेदवार कैलाशचंद यांना अवघे एक मत मिळाले. विशेष म्हणजे याच वार्डमध्ये नोटालाही एक मत मिळाले आहे. त्यामुळे भाजप उमेदवार आणि नोटा यांना समान मते मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RAJASTHAN ELECTION RESULT
निवडणुकीत भाजप उमेदवारासह पती आणि मुलाचे अपहरण; राजकीय वर्तुळात खळबळ

भाजप उमेदवाराला कुटुंबियांचीही साथ नाही? कैलाशचंद यांना मिळालेले एकमेव मत त्यांचे स्वतःचेही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या निकालाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उमेदवाराला स्वतःच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांचाही पाठिंबा मिळाला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

RAJASTHAN ELECTION RESULT
ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

काँग्रेसच्या हिना खानम यांचा दणदणीत विजय

वॉर्ड क्रमांक 13 मधून काँग्रेसच्या उमेदवार हिना खानम यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांना तब्बल 376 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार रशीद खान हे 195 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हिना खानम यांनी रशीद खान यांचा तब्बल 181 मतांनी पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com