जयपूर-दिल्ली महामार्गावर भीषण अपघात
उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू
तिघे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
ट्रक चालक घटनास्थळावरून फरार
जयपूर-दिल्ली द्रुतगती मार्गावर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिली, यात उपनिरीक्षक पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करौली जिल्ह्यातील सपोत्रा पोलीस ठाण्यात तैनात असलेले उपनिरीक्षक हनुमान सहाय मीना, कॉन्स्टेबल काजड चौधरी, रामराज बैरवा आणि रामनरेश मीना हे चौघे फसवणुकीच्या एका प्रकरणाचा तपास करून मेरठहून परत येत होते.
दरम्यान जयपूर-दिल्ली द्रुतगती मार्गावर आंधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल बेला येथे सकाळी सुमारे ५:३० वाजताच्या सुमारास एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.
या दुर्घटनेत उपनिरीक्षक हनुमान सहाय मीना यांचा जागीच मृत्यू झाला, तर कॉन्स्टेबल काजड चौधरी, रामराज बैरवा आणि रामनरेश मीना गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी पोलीस ट्रकचालकाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.