ISRO Mission Gaganyaan
आदित्य एल १ आणि चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची महत्त्वाची चाचणी या महिन्यात केली जाणार असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. भारताचे संशोधक पहिल्यांदाच अंतराळात जाणार असल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.
गगनयान ही भारताची पहिलीच अंतराळ मोहीम असून इस्रो २१ ऑक्टोबरला या मोहिमेतील अबॉर्ट मिशन -१ चं प्रक्षेपण करणार आहे. या मोहिमेसाठीच्या पहिल्या क्रू मॉड्यूलची पहिली अबॉर्ट चाचणी या महिन्यात घेतली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या मोहिमेच्या यशानंतरच पुढील दिशा आणि योजना आखली जाणार आहे.
आणखी तीन चाचण्या घेतल्या जातील : एस. सोमनाथ
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, टिव्ही -डी १ ची पहिली मानवरहित चाचणी या महिन्याच्या २१ तारखेला घेण्यात येणार आहे. त्यानंतर टिव्ही -डी २, टिव्ही -डी ३ आणि टिव्ही -डी ४ अशा आणखी तीन चाचण्या घेण्यात येतील. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळात कोणतीही अडचण
पहिल्या टप्प्यात 'व्योमीत्र'जाणार अंतराळात
पृथ्वीपासून १७ किमी उंचीवर चाचणी करण्यात येणाऱ्या यानापासून क्रू मॉड्युल वेगळे होण्याची अपेक्षा आहे. या चाचणीत क्रू मॉड्युलचं लॉन्च व्हेईकलद्वारे प्रक्षेपण करण्यात येईल. त्यांनतर ठराविक उंची गाठल्यानतर क्रू मॉड्युल वेगळं होईल. अबॉर्ट मिशन पूर्ण केल्यानंतर ते बंगालच्या उपसागरात लँड होईल. त्यांनतर नौदलाकडून हे क्रू मॉड्युल ताब्यात घेतलं जाणार आहे. दरम्यान गगनयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 'व्योमीत्र' हा रोबोट अंतराळात पाठविण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.