Mobile Addiction: भयंकर! मोबाईल वापरण्यास विरोध केला; चिडलेल्या मुलानं आईचं डोकं भिंतीवर आपटलं, महिलेचा मृत्यू

Mobile Addiction: केरळमध्ये मोबाईल वापरण्यास विरोध केल्याने मुलाने आईवर हल्ला केला आहे.
kerala crime news file photos
kerala crime news file photosSaam Tv
Published On

Kerala Latest News:

केरळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमध्ये मोबाईल वापरण्यास विरोध केल्याने मुलाने आईवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सध्याची लहान मुले मोबाइलमध्ये गुंतललेली पाहायला मिळतात. मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांचं मानसिक संतुलन बिघडल्याची प्रकरणे समोर येऊ लागले आहेत. अशाच एका मानसिक संतुलन बिघडलेल्या मुलाने त्याच्या आईची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केरळच्या कनिचिरा येथे हा प्रकार घडला आहे.

kerala crime news file photos
Husband-Wife News : का रे दुरावा...वर्षभरातच बायकोला संशय आला, नवऱ्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

मिळलेल्या माहितीनुसार, केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील कनिचिरा येथे राहणाऱ्या ६३ वर्षांच्या रुग्मिनी या गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. शनिवारी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

केरळमधील ६३ वर्षीय महिलेच्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. मुलगा सतत मोबाइल वापरू लागल्याने आईने त्याला मोबाइल वापरण्यास विरोध केला. मात्र, आईने मोबाइल वापरण्यास विरोध केल्याने मुलगा चिडला. त्यानंतर मुलाने क्रूरपणे आईवर हल्ला केला. आईचे डोके भितींवर आपटले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.

kerala crime news file photos
Israel-Hamas War: इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक; २४ तासात ३२४ पॅलेस्टाईन नागरिक ठार

मुलाने गुन्हा केला मान्य

महिला गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलाने गुन्हा मान्य केला.

आरोपीने चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, आईने मोबाइलचा वापर करण्यास रोखल्याने हल्ला केला. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या मुलाचं मानसिक संतुलन बिघडल्याचं बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com