Husband-Wife News : का रे दुरावा...वर्षभरातच बायकोला संशय आला, नवऱ्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Husband Wife Relation : लग्नाला वर्ष उलटूनही त्यानं शारिरीक संबंध ठेवले नाहीत, असा आरोप तरुणीनं केला आहे.
Husband-Wife News
Husband-Wife NewsSaam Tv
Published On

Agra News:

तरुणीनं सुखी संसाराची स्वप्ने बघितली होती. पण अवघ्या वर्षभरातच ती बेचिराख झाली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका तरुणीला भयंकर अनुभव आलाय. लग्नाला वर्ष उलटूनही त्यानं शारिरीक संबंध ठेवले नाहीत, असा आरोप तरुणीनं केला आहे. तिनं पती आणि सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

लग्नाला एक महिना उलटला तरीही तरुणीच्या पतीनं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. पती त्याच्या आईच्या खोलीत जाऊन झोपतो, असा तिचा आरोप आहे. याबाबत तिनं सासूलाच सांगितलं, पण तिनं त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. पती नपुंसक असल्याचा दावा तिनं केला आहे. आपली फसवणूक झाली असं म्हणत तिनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आग्रा (Agra) येथील तरूणीचे दिल्लीतल्या तरूणाशी १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाले होते. तो सीमापुरीमध्ये राहतो. तरुणीच्या पतीची पॅथॉलॉजी लॅब आहे. तर सासरे सरकारी नोकरीत होते. लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने बघितली होती. पण पती नपुंसक असल्याचे समजल्यानंतर माझी सर्व स्वप्ने, आशा-आकांक्षा संपुष्टात आल्या, असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे.

सासरच्यांना सांगितलं, पण दुर्लक्ष केलं....

पतीबाबत (Husband) तिनं सासरच्या मंडळींना सांगितलं. पण त्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिलाच टोमणे मारायला लागले. गेल्या पाच महिन्यांपासून तरूणी माहेरी राहते. शुक्रवारी तिनं पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी (Police) पती आणि सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा नोंदवला.

Husband-Wife News
Kota Crime News : टिफिन बॉयनं केलं भयंकर कृत्य, दारू पाजून १५ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार

तरुणीनं सांगितलं की, तिचे वडील बँकेत नोकरी करायचे. ते सेवानिवृत्त झालेत. तर सासरे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. तिची नणंद दिल्लीत डॉक्टर आहे. आम्हाला कुणी काही करू शकत नाही, असं सासरचे म्हणतात. पतीची तक्रार केल्यानंतर सासरच्यांनी तिचाच छळ सुरू केला. सासरे तर तिला वर्णावरून टोमणे मारत असत. खोलीचा दरवाजाही लावू दिला जात नव्हता. पती नपुंसक असल्याची माहिती तिनं माहेरच्या लोकांना दिली. त्यांनी कशीबशी समजूत काढून पुन्हा सासरी पाठवली.

तिथं गेल्यानंतरही पती खोलीत येत नव्हता. तिच्याशी बोलतही नव्हता. तिला खोलीतील वॉशरूमही वापरू देत नव्हता. अखेर त्रासाला कंटाळून तिनं पुन्हा माहेर गाठलं. तेव्हापासून ती तिथंच राहतेय. तरुणीनं पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळवणूक प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com