Israel Hamas War: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर ठार; युद्ध आणखीच भडकण्याची शक्यता

Israel Hamas War News: इस्रायलने पुन्हा सीरियाची राजधानी दमास्कजवळील तळावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर ठार झाला आहे.
Israel Hamas War Latest Marathi News
Israel Hamas War Latest Marathi NewsSaam TV

Israel Hamas War Latest Updates

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमधील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सोमवारी इस्रायलने पुन्हा सीरियाची राजधानी दमास्कजवळील तळावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर ठार झाला आहे. सईद रझी मौसावी असं ठार झालेल्या कमांडरचं नाव असून ते सीरियातील इराणच्या निमलष्करी दलाच्या रिव्होल्यूशनरी गार्डचे सल्लागार होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Israel Hamas War Latest Marathi News
Israel–Hamas War: इस्रायलचा हमासवर सर्वात मोठा हल्ला; गाझापट्टीत बॉम्बवर्षाव, आतापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू

इराणी प्रसारमाध्यमांनी सईद रझी मौसावी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त दिले आहे. मौसावी हे रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांच्या जवळचे असल्याचेही म्हटले जाते. जानेवारी २०२० मध्ये इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी मारला गेला होता. (Latest Marathi News)

लेबनॉन-इस्रायल सीमेवर इस्रायली सैनिक आणि दहशतवादी संघटना हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष सातत्याने तीव्र होत असताना मौसावी यांची हत्या झाली आहे. यामुळे इस्रायल-हमास युद्ध आणखीच भडकण्याची चिन्ह आहे.

यापूर्वी, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला इस्त्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात सीरियामधील दोन जनरल ठार झाले होते. इराणची वृत्तसंस्था IRNA ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने सोमवारी सीरियामधील शिया धार्मिक स्थळाजवळील सय्यदा झैनाब परिसरात हवाई हल्ले केले.

इस्त्रायलच्या या हल्ल्यात मौसावी मारला गेला. इस्रायलने गेल्या काही वर्षांत सीरियातील सरकार-नियंत्रित भागात शेकडो हल्ले केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे इस्रायलच्या लष्कराने अद्याप या हल्ल्याबाबत कोणती अधिकृत माहिती जारी केलेली नाही. तसेच सीरियाच्या सरकारी माध्यमांनीही देखील कोणतीही माहिती दिलेली नाही.

Israel Hamas War Latest Marathi News
Rashi Bhavishya: सावधान! 'या' राशीच्या लोकांची महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता, वाचा आजचे राशीभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com