Israel-Hamas War: एका क्षणात सगळं संपलं, १४ लोकांच्या कुटुंबात फक्त ४ वर्षांची चिमुकली जिवंत; मन हेलावणारी घटना!

Israel-Hamas War Update News: एकूण १४ सदस्य असलेल्या या घरात आता फक्त ४ वर्षांची चिमुकलीच जिवंत राहिली.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarSaam Tv
Published On: 

Israel-Hamas War News:

इस्राइल आणि हमासमध्ये (Hamas) संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत असून गाझापट्टीवर हमासशी संबंधित ठिकाणांवर इस्राइलच्या हवाई दलाकडून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.

या युद्धामध्ये अनेक कुटूंबे, संसार उध्वस्त होत असून एकाच कुटूंबातील १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकूण १४ सदस्य असलेल्या या घरात आता फक्त ४ वर्षांची चिमुकलीच जिवंत राहिली. काय आहे ही मन हेलावणारी कहाणी, जाणून घ्या सविस्तर...

इस्राइलच्या हल्ल्यात (Israel) गाझामधील अनेक नागरिकांचा बळी जात आहे. या हल्ल्यामधील एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. बॉम्ब हल्ल्यात (Bomb Attack) जखमी झालेली फुला अल-लहम नावाची चार वर्षांची मुलगी खान युनूस रुग्णालयात दाखल झाली होती. जेव्हा या मुलीने डोळे उघडून आपल्या घरातील लोकांची शोधाशोध केली. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला.

कारण या हल्ल्यात १४ सदस्य असलेल्या या घरामधील १३ जणांचा मृत्यू झाला अन् वाचली ती फक्त चार वर्षांची फुला. हा धक्का पचवणे आणि समजून घेणेही या चिमुकलीसाठी निव्वळ अशक्य होते. एका क्षणात या चिमुकलीचे संपूर्ण कुटूंबच उध्वस्त झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि तिच्या भावांचा समावेश आहे.

Israel-Hamas War
Manoj Jarange Patil : 'मराठ्यांनी तुम्हाला राजकीय ओळख दिली, त्यांनाच तुम्ही विसरला', जरांगे पाटीलांचा पुन्हा भुजबळांवर निशाणा

हल्ल्यातून वाचलेल्या या चिमुकलीच्या आजीने सांगितले की, "अचानक, कोणताही इशारा न देता घरात राहणाऱ्या लोकांवर बॉम्बहल्ला केला. यामध्ये माझी नात फुलाशिवाय कोणीही वाचले नाही. फुला वगळता सर्वांचा मृत्यू झाला. फुला खूप भाग्यवान आहे, कारण ती या हल्ल्यातून एकटीच बचावली, असेही चिमुकलीच्या आजीने सांगितले. (Latest Marathi News)

Israel-Hamas War
Nandurbar Crime News : घातपात की...? 150 फूट खोल दरीत आढळला युवकाचा मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.