Israel's Iron Dome System: इस्राइलने हवेतच नष्ट केली हजारो क्षेपणास्त्र, काय आहे इस्राइलची 'आयर्न डोम सिस्टम'

Operation Al-Aqsa Flood: ऑप्रेशन अल-अक्सा फ्लडच्या घोषणेनंतर २० मिनिटातच इस्राइलच्या दिशेने ५ हजार रॉकेट डागण्यात आले.
Israel's Iron Dome System
Israel's Iron Dome SystemSaam Digital
Published On: 

हमास या आतंकवादी संघटनेकडून इस्राइलवर सतत हल्ले केले जात आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी हमासकडून मोठ्या प्रमाणात रॉकेटचे हल्ले केल्यांनतर आणि दक्षिण इस्राइलमध्ये उग्रवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलने युद्धासाठी तयार राहण्याच आवाहन केलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देशाला संबोधित करताना, आपण सध्या युद्धात असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान ऑप्रेशन अल-अक्सा फ्लडच्या घोषणेनंतर २० मिनिटातच इस्राइलच्या दिशेने ५ हजार रॉकेट डागण्यात आले. त्यानंतर संपूर्ण इस्राइलमध्ये हवाई हल्ल्याच्या सायरनने सकाळची शांतता भंग केली आणि जगातील सर्वोत्कृष्ट वायुसेनेच्या सुरक्षा प्रणालीमधील एक असलेली आयर्न डोम 'सिस्टिम'सक्रीय झाली.

आयर्न डोम सिस्टिम जगातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा प्रणालींपैकी एक आहे. शनिवारी या प्रणालीचा अविष्कार पाहायला मिळाला. हमासने डागलेली क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आल्यानंतर आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण आकाश व्यापले होते. तसा हा हल्ला मोठा होता. मात्र हल्ला परतवून लावण्यात 'आयर्न डोम सिस्टिम' यशस्वी ठरली.

काय आहे आयर्न डोम सिस्टिम?

आयर्न डोम सिस्टिम ही जमिनीवरून हवेत मारा करणारी कमी पल्ल्याची एक 'एअर डिफेन्स सिस्टिम'आहे. जी कमी अंतरावरील रॉकेट हल्ले, तोप गोळे आणि मानवरहित हवाई वाहनांचा सामना करण्यासाठी इस्राइलच्या अनेक भागांमध्ये तैनात केलेली आहे. या प्रणालीची रेंज जवळपास ७० किमी असून यामध्ये डिटेक्शन आणि ट्रॅकिंग रडार, युद्ध व्यवस्थापन, शस्त्र नियंत्रण आणि २० तामीर क्षेपणास्त्र यांनी सुसज्ज अशी ही संरक्षण प्रणाली आहे. जी कोणत्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला नेहमी सज्ज असते.

२०११ पासून ही प्रणाली इस्राइलच्या सुरक्षा यंत्रणेत कार्यरत आहे. २००६ च्या लेबनन संघर्षादरम्यान हिजबुल्लाहकडून हजारो रॉकेट डागण्यात आले आणि इस्राइलच्या उत्तरेकडे अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. ज्यात अनेक लोक मारले गेले होते. या हल्ल्यानंतरच इस्रायलने हवाई सुरक्षा प्रणाली विकसित करण्याची तयारी सुरू केली होती.

Israel's Iron Dome System
Bengaluru Fire News: फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; 15 जणांचा होरपळून मृत्यू

काय काम करते आयर्न डोम सिस्टिम

इस्राइलच्या दिशेने जेव्हा क्षेपणास्त्र डागली जातात तेव्हा डिटेक्शन आणि ट्रॅकिंग रडारकडून याचा शोध घेतला जातो आणि युद्ध व्यवस्थापन प्रणालीला याची दिली जाते. ही प्रणाली डागलेल्या क्षेपणास्त्राचा प्रकार, गती आणि लक्ष्य याचा शोध घेऊन अतिशय वेगाने एक जटील गणना करते. जर येणारे क्षेपणास्त्र नागरी भागात किंवा धोरणात्मक असेल तर स्वतः लॉन्चर क्षणाचाही विलंब न लावता तामीर क्षेपणास्त्र डागतं आणि हवेतच त्या रॉकेटला नष्ट केलं जातं. आयर्न डोम सिस्टिम चे निर्माते राफेल यांचा दावा आहे की, ही प्रणाली हल्ला परतवून लावण्यात ९० टक्के सक्षम आहे आणि आतापर्यंत २ हजाराहून अधिक हटले परतवून लावले आहेत.

यावेळी काय झालं ?

हमासकडून इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला करूनही या हल्ल्यावेळी आयर्न डोम सिस्टिम अत्यंत शक्तिशाली असल्याचं पाहायला मिळालं. वास्तविक अनेक वर्षांपासून हमास आयर्न डोम सिस्टिमच्या उणिवा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी हमासचा हा प्रयत्न काहीअंशी यशस्वी झाला. हमासने यावेळी साल्व्हो क्षेपणास्त्र हल्ला केला (कमी वेळेत आणि एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्र लॉन्च प्रणाली). त्यामुळे आयर्न डोम सिस्टिमला सर्व रॉकेटचा मारा रोखता आला नाही. यावेळी अवघ्या २० मिनिटात ५ हजार क्षेपणास्त्र डागण्यात आली होती.

हमास आपली क्रूड रॉकेट सिस्टिम विकसित करत आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये त्याने इस्राइलच्या तेल अवीव आणि जेरूसेलमसह मुख्य शहरांपर्यंत या क्षेपणास्त्रांची रेंजे वाढवली आहे. त्याचबरोबर हमासकडून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र त्याला रोखण्यासाठी डागलेले तामीर क्षेपणास्त्राच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. मात्र तरीही इस्राइलसाठी आयर्न डोम सिस्टिमच्या किमतीपेक्षा त्याची उपस्थिती कितीतरी अधिक महत्त्वाची आहे. या सिस्टिम ने हे सिद्ध केलय की इस्राइलवरील हल्ले परतवून लावू शकते आणि लोकांचे जीवही ही वाचवू शकते.

इस्राइलने दावा केला होता आहे की, २०१२ मध्ये हमास सोबत झालेल्या संघर्षात गाजा पट्टीतून नागरी क्षेत्रात डागलेल्या ४०० रॉकेटपैकी ८५ टक्के क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली होती. २०१४ मध्ये ४५०० क्षेपणास्त्र हल्ल्यांमधील ८०० रॉकेट हल्ले परतवून लावण्यात आले आणि ७३५ रॉकेट हवेतच नष्ट करण्यात आली होती. इस्राईलने हमासच्या साल्व्हो हल्ल्याना रोखण्यासाठी २०२१ मध्ये आयर्न डोम प्रणाली अपग्रेड केली आहे. याचवर्षी मे २०२१ मध्ये हमास ने पुन्हा हल्ला केला. यावेळी हमासने सुरुवातीला १ हजार क्षेपणास्त्र हल्ले केले आणि संघर्ष थांबेपर्यंत एकूण ४५०० हल्ले केले होते. यातील ९० टक्के हल्ले आयर्न डोम सिस्टिम ने परतवून लावेल होते.

Israel's Iron Dome System
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान सलग ५ भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला; जवळपास २००० नागरिकांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com