Bengaluru Fire News: फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; 15 जणांचा होरपळून मृत्यू

Fire News: या आगीत आतापर्यंत १५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय.
Bengaluru Fire News
Bengaluru Fire NewsSaam TV
Published On: 

Bengaluru News:

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. फटाक्यांच्या गोदामात स्फोट होऊन भीषण आग लागलीये. या आगीत आतापर्यंत १५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. घटनेत अन्य ४ जण जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bengaluru Fire News
Bus Fire On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; 32 प्रवासी थोडक्यात बचावले

शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. कामगार रात्रीच्यावेळी फटाक्यांचा माल ट्रकमधून दुकानात घेऊन जात होते. त्यावेळीच आगीचा भडका उडाला. काही कळण्याआधी आगीने मोठा पेट घेतला. यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी व्यक्ती इकडे तिकडे पळू लागले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी या घटनेबाबत ट्वीट केलं आहे. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकार ५ लाखांची आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. आगीमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी एफएसएल टीम तयार करण्यात आलीये.

Bengaluru Fire News
Satara Crime: साताऱ्याच्या माण तालुक्यात दुहेरी हत्याकांड; धारदार शस्त्राने वार करत पती- पत्नीचा निर्घृण खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com