Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान सलग ५ भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला; जवळपास २००० नागरिकांचा मृत्यू

Afghanistan Earthquake Update : हेरातच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास भूकंपाचे पाच धक्के जाणवले.
Afghanistan Earthquake
Afghanistan EarthquakeSaam TV
Published On

Afghanistan Earthquake :

अफगाणिस्तान शनिवारी तीव्र भूकंपाच्या झटक्यांना हादरला. भूकंपाच्या ६.३ रिश्टर स्केलचा जोरदार झटका नागरिकांनी अनुभवला. यामध्ये आतापर्यंत २००० नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती देखील वर्तवली जात आहे. जीवितहानीसह मोठी वित्तहानी देखील झाली आहे.

अफगाणिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले की, भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भूकंपाचं केंद्र हेरात शहराच्या वायव्येस ४० किलोमीटर अंतरावर होते. (Latest News)

Afghanistan Earthquake
Israel Palestine Conflict: काय आहे इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष? ३ धर्माचे लोकं एकमेकांच्या समोर का आलेत?

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२.११ वाजता ६.१ तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर १२.१९ वाजता ५.६ तीव्रतेचा आणि तिसरा भूकंप १२.४२ वाजता 6.3 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

Afghanistan Earthquake
Narendra Modi on Israel: इस्राइलवरील रॉकेट हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू; नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त, म्हणाले,'दहशतवादी हल्ल्यामुळे...'

दरम्यान, हेरातच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास भूकंपाचे पाच धक्के जाणवले. तीव्र झटक्यानंतर नागरिकांना घराबाहेर, ऑफिसबाहेर पडत मोकळ्या जागी धाव घेतली.

सोशल मीडियावरील भूकंपानंतरच्या भयावह स्थितीची अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हेरात शहरातील शेकडो इमारती कोसळल्याचं समोर आलं आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार फराह आणि बादघिस प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com