Israel Palestine Conflict: काय आहे इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष? ३ धर्माचे लोकं एकमेकांच्या समोर का आलेत?

Israel Palestine: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी आज सकाळी हल्ला केला. पॅलेस्टाईनकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. पण या दोन भागांमध्ये वाद का पेटलाय.
Israel Palestine
Israel PalestineSaam Tv
Published On

Israel Palestine Conflict Explained:

इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी आज सकाळी हल्ला केला. पॅलेस्टाईनकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यानंतर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. यादरम्यान अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हिंसाचार तात्काळ थांबवण्याचे आवाहन केलं. तुम्हाला माहिती या दोन्ही देशांमधील संघर्ष हा आत्ताचा नाहीये. या दोन्हींमधील संघर्ष जवळपास १०० वर्षांपासून चालू आहे. या दोघांमध्ये पश्चिम किनारा, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स या भागांवरून वाद सुरू आहे. (Latest News)

या भागांसह पूर्व जेरुसलेमवरुनही दोघांमध्ये वाद आहे. १९८७-९३ या काळात इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा पहिला टप्पा होता. याच काळात सध्या इस्राइलवर हल्ले करत असलेल्या हमासचा उदय झाला. पीएलओपेक्षा हमासची विचारधारा अत्यंत वेगळी आहे. हमासचा इस्रायलला तीव्र विरोध आहे. त्यांना इस्रायल मान्य नाही. जेरुस्लेममध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माचे प्रसिद्ध धार्मिकस्थळं आहेत. इस्रायलचं या शहरावर नियंत्रण ठेवल्याने वाद होत आहे.

दरम्यान, इस्राइल आणि पॅलेस्टाईन हा वाद दुसऱ्या महायुद्धानंतर चालू झाला आहे. अरब हे पॅलेस्टाईनमधील मूळ निवासी आहेत. पण ज्यूंसाठी इस्राइलची स्थापना झालीय. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार १९४७ ला हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचे दोन भाग केले. त्यातील एक भाग ज्यूंना देण्यात आला होता तर दुसरा भाग अरब समुदायातील लोकांना देण्यात आला होता, जे बहुतेक इस्लामचे पालन करतात. त्यानंतर १४ मे १९४८ रोजी ज्यूंनी त्यांच्या भागाला एक स्वतंत्र देश घोषित केलं. याचे नाव इस्राइल होते. परंतु अरब समुदायला हा निर्णय आवडला नाही. म्हणून युद्ध घोषित करण्यात आले आणि लाखो पॅलेस्टिनी बेघर झाले होते.

हे युद्ध झाल्यानंतर या दोन भागांना तीन भागात विभागण्यात आले. पॅलेस्टाईनला वेस्ट बँक आणि गाझा पट्टीचे क्षेत्र मिळाले. हे क्षेत्र गाझा पट्टी इस्रायल आणि इजिप्तच्या दरम्यान आहे. गाझा पट्टी पॅलेस्टिनी क्षेत्राचा छोटा भाग आहे. हे इजिप्त आणि इस्राइलदरम्यान असलेल्या भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. पॅलेस्टाईन हा अरब आणि बहुसंख्य मुस्लिम बहुल प्रदेश आहे. हे सर्व लोक निर्वासित आहेत. पहिल्या अरब-इस्राइल युद्धातील त्यांचे वंशज आहेत. सप्टेंबरमध्ये २००५ मध्ये इस्राइलनं गाझा पट्टीमधून आलं सैन्य काढून घेतलं. २००७ मध्ये इस्राइलनं या भागावर अनेक प्रतिबंध लावलेत.

पॅलेस्टाईनच्या मते, वेस्ट किनारा आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना केली जावी. दरम्यान गाझाच्या अनेक भागावर पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासचा ताबा आहे. तर वेस्ट म्हणजेच दक्षिण किनाऱ्यावर इस्राइलच्या नियंत्रणात आहे. इस्राइलने येरुशलम शहरावरही युद्ध करत त्यावर ताबा घेतला आणि त्या शहराच्या पश्चिमभागापर्यंत आपला विस्तार केलाय. दरम्यान पॅलेस्टाईनला जेरुसलेम राजधानी बनवायचं आहे. याशिवाय अरब समुदायाचे लोक जेरुसलेमला पवित्र स्थान मानतात कारण येथे अल-अक्सा मशीद आहे. ज्यू लोकही या शहराला पवित्र समजतात. याच मुद्द्यावरून गेल्या २५ वर्षापासून येथे शांत नाही.

Israel Palestine
Israel vs Palestine: इस्राइलमधील भारतीयांनी 'या' भागात जाणं टाळा; केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com