Israel vs Palestine: इस्राइलमधील भारतीयांनी 'या' भागात जाणं टाळा; केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Israel vs Palestine: भारत सरकारकडून इस्राइलमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूनचा जाहीर करण्यात आलीय.
Israel vs Palestine
Israel vs Palestinesaam Tv
Published On

Israel vs Palestine:

पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्राइलवर रॉकेट हल्ला केलाय. त्यानंतर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासच्या दहशतवाद्यांना ताकीद देत गाझा पट्टीवर हल्ला केलाय. पॅलेस्टाईन आणि इस्राइलमधील युद्धादरम्यान भारत सरकारकडून इस्राइलमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूनचा जाहीर करण्यात आलीय. (Latest News)

इस्राइलचे सैन्य जमिनीवरील घुसखोरी आणि हमास दहशतवाद्यांचे रॉकेट हल्ले हाणून पाडतील, असा विश्वास राजदूत नाओर गिलॉन यांनी व्यक्त केलाय. इस्राइल सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रयत्न करेल. यावेळी गिलॉन यांनी भारताच्या भूमिकेवर टिप्पणी केली. हमासच्या हल्ल्यानंतर इस्राइलच्या सैन्यानं स्वॉर्ड्स आयरन मोहीम सुरू केलीय. इस्राइलच्या सैन्यांकडून करण्यात येणाऱ्या प्रतिहल्लाविषयी माहिती देताना भारतातील इस्राइलचे राजदूत नाओर गिलॉन म्हणाले की, इस्राइल पॅलेस्टाईन दहशतवाद्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यास सक्षम आहे. शनिवारी झोपेत असलेल्या सामान्य नागरिकांना निशाणा करण्यात आलंय.

राजदूताने दिलेल्या माहितीनुसार, हमासकडून भ्याड कारवाया केल्या जात आहेत. महिला, लहान मुले आणि वृद्धांना लक्ष्य करण्यात आले आहे. हमासच्या हल्ल्यात शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. हमासने इस्राइलच्या शहरांवर २ हजारहून अधिक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट हल्ला केलाय. तसेच रस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे.

इस्राइल आणि हमासच्या युद्धादरम्यान भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारताकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्यात. आवश्यक काम असेल तरचं घराच्या बाहेर जावं. संवेदनशील भागात जाऊ नका. स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिलेल्या सुचनांचे पालन करा. असं आवाहन भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे.

दुतावासाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवदेनातून इस्रायली होम फ्रंड कमांडच्या वेबसाईटवर महत्त्वाची सुचना दिलीय. हेल्पलाइनसाठी परराष्ट्र मंत्रालयानं फोन नंबर +97235226748 आणि कॉन्सुलेटच्या ई-मेल आयडी consl.telaviv@mea.gov.in हे जाहीर केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com