Israeli Palestinian Conflict News:
पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राइलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ला केलाय. या हल्ल्यामुळे इस्त्राइल देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत म्हणाले, 'इस्त्राइलवर झालेल्या दहशादी हल्ल्याच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. आमच्या प्रार्थना पीडित आणि कुटुंबीयांबरोबर आहे. या काळात आम्ही इस्त्रायलच्या पाठीशा उभे आहोत'.
तत्पूर्वी, हमाम या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला. इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना युद्धाची घोषणा केली आहे.
'हमाम या दहशतवादी संघटनेकडून महिला, लहान आणि वृद्धांना लक्ष्य केलंय. हमामने केलेल्या हल्ल्यात शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या दोन शहरात क्षेपणास्त्रे आणि रॉकेट हल्ला केला आहे. तसेच रस्त्यांवर अंधाधुद गोळीबार देखील केला आहे, अशी माहिती राजदूतांनी दिली आहे.
आज सकाळी पाच हजारांहून अधिक रॉकेट हल्ले झाले आहेत. हल्ल्यानंतर जवळपास ४० मिनिटे सायरनचा आवाज सुरू होता. या हल्ल्यानंतर सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं.
दरम्यान, इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर भारताकडून भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा. संवेदनशील भागात जाऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच हेल्पलाइनसाठी परराष्ट्र मंत्रालयानं फोन नंबर +97235226748 दिला आहे. तसेच मदतीसाठी consl.telaviv@mea.gov.in हा ई-मेल आयडी जाहीर करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.