Israel Declares War: मोठी बातमी! पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यानं वातावरण चिघळलं; इस्रायलकडून युद्धाची घोषणा

Israel News: हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केलीये.
Israel Declares War
Israel Declares WarSaam TV
Published On

Israel:

गाझामधून आज सकाळपासून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले करण्यात आलेत. अनेक निवासी ठिकाणी हल्ले करण्यात आलेत. त्यामुळे इस्रायलने या हल्ल्याविरोधात युद्धाची घोषणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत निवेदन जाहीर करून आम्ही युद्धासाठी तयार असल्याचं इस्रायलने म्हटलंय. (Latest Marathi News)

Israel Declares War
Bhandara Crime News : भंडा-यात दाेन कुटुंबात वाद; एकाची हत्या, दाेघे जखमी

गाझामधून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत तब्बल ५ हजारांहून जास्त रॉकेट डागण्यात आलेत. इस्रायलमध्ये आज फेस्टिवल हॉलिडे आहे. त्यामुळे सर्व नागरिक सुट्टी एन्जॉय करत असताना अचानक रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केलीये.

सकाळी ६.३० च्या सुमारास ५ हजारांहून अधिक रॉकेट हल्ले करण्यात आलेत. जवळपास ४० मिनीटे सायरनचा आवाज सुरूच होता. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गाजाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असंही इस्रायलनं म्हटलंय. इस्रायलवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील गेल्या वर्षी इस्रायलवर गाजाकडून हल्ला करण्यात आला होता.

इस्रायल डिफेन्स फोर्सकडून या हल्ल्यानंतर एक ट्वीट पोस्ट करण्यात आलं आहे. या पोस्टवर लिहिलंय की, "आजची सकाळ सायनच्या आवाजांनी झाली. कारण गाजाकडून आमच्यावर रॉकेट हल्ले केले जात होते. मात्र आम्ही स्वत:ची सुरक्षा करण्यास आता सक्षम आहोत."इस्त्रायमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घुसल्याने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Israel Declares War
Kalyan Crime News: धक्कदायक! कल्याणमध्ये महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com