आखाती युद्धाला 50 दिवस पूर्ण, इराणच्या मोजताबा खोमेनींचा मृत्यू?

Confusion in Iran: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींच्या मृत्यूनंतर इराण पेटून उठलाय.. मात्र आता युद्धाला 50 दिवस उलटल्यानंतर त्यांचे पुत्र मोजताबा खोमेंनींच्याही मृत्यूची चर्चा सुरु झालीय... मोजताबांचा खरचं मृत्यू झालाय का? मोजताबा खोमेनी इतक्या दिवसांपसून कुठे आहेत? इराणमध्ये नेमकं काय घ़डतयं?
Confusion surrounds Mojtaba Khamenei after his image appears in an IRGC martyr tribute video amid ongoing Iran war.
Confusion surrounds Mojtaba Khamenei after his image appears in an IRGC martyr tribute video amid ongoing Iran war.saam tv
Published On

आखाती युद्ध अद्याप पेटलेलं असताना इराणमधून आलेल्या एका बातमीनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय...इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' अर्थात IRGCनं शहीद झालेल्या इराणी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खोमेनी यांचाही फोटो शहीद म्हणून झळकल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मोजताबा खोमेनींचा मृत्यू झालाय का? असा सवाल उपस्थित केला जातोय...

इराण-अमेरिका, इस्रायल संघर्षाला 50 दिवस पूर्ण झाले... शत्रूराष्ट्रांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पुत्र मोजताबा खोमेनींकडे इराणची सुत्र आली. मात्र तेही हल्ल्य़ात गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. कारण त्यांनी एकदाही अमेरीका, इस्त्राईलच्या हल्ल्यासंदर्भात ठोस भूमिका मांडली नाही. गेल्या महिन्याभरात मोजताबा खोमेनींबद्दल काय चर्चा सुरु होत्या...

9 मार्च 2026

'अ‍ॅसेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्स'ने मोजताबा खोमेनी इराणचे तिसरे सर्वोच्च नेते होणार असल्याची घोषणा केली...

20 मार्च 2026

मोजताबा खोमेनी नवरोज निमित्त पहिले अधिकृत भाषण देणार असल्याची चर्चा

10 एप्रिल 2026

खोमेनी हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं गायब असल्याची चर्चा सुरु झाली...

15 एप्रिल 2026

मोजताबा खोमेनी वॉर रुममधून युद्धाचा आढावा घेत असल्याचा AI व्हिडिओ समोर आला

24 एप्रिल 2026

गंभीर जखमी झालेल्या मोजताबांवर रशियात गुप्त ठिकाणी उपचार सुरु असल्याची चर्चा होती. हल्ल्यात चेहरा भाजल्यानं त्यांची प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. त्यांच्या हाता, पायाला गंभीर इजा झाली. खोमेनी कृत्रिम पाय लावणार असल्याचीही माहिती समोर आली.

25 एप्रिल 2026

मोजताबा खोमेनी कोणाशीही प्रत्यक्ष न बोलता केवळ पत्रांच्या माध्यमातून आदेश देत असल्याची चर्चा

दरम्यान IRGCनं जारी केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मोजताबा खोमेनींचा फोटो असल्याचं हा तांत्रिक घोळ आहे की त्यांचा खरोखरचं मृत्यू झालाय? इराणनं आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी मोजताबांच्या मृत्यूची बातमी दाबून ठेवली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...मात्र मोजताबा खोमेनींचा मृत्यू झालाय हे सत्य असेल तर इराणी सत्तेत मोठी पोकळी निर्माण होऊ शकते, हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com