Iran-Israel War: होर्मुझचे नेतृत्व करणारे इराणचे नौदल कमांडर तांगसिरींचा इस्रायलच्या हल्ल्यात ठार

Iran Navy Commander Alireza Tangsiri Killed: इस्रायलने एका हल्ल्यात इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तंगसिरी यांना ठार केल्याचा दावा केला आहे. या हल्लामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढला आहे. दरम्यान इराणने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
Iran Navy Commander Alireza Tangsiri Killed:
Tensions escalate in the Middle East after reported killing of Iran naval commander.saam tv
Published On
Summary
  • इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी ठार झाल्याचा इस्रायलचा दावा

  • बंदर अब्बासमध्ये हल्ला झाल्याची माहिती

  • होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीचे नेतृत्व तांगसिरी करत होते

इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेने आतापर्यंत इराणच्या अनेक प्रमुख लष्करी कमांडरांना लक्ष्य केले आहे. आता होर्मुझ नाकेबंदीचे नेतृत्व करणाऱ्या अलीरेझा तंगसिरी यांना ठार केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याची जबाबदारी अलीरेझा तांगसिरी यांच्यावर होती.

Iran Navy Commander Alireza Tangsiri Killed:
Israel-Iran War: आखाती युद्ध वर्षभर चालणार? मोसाद उलथवणार खामेंनेईंची सत्ता?

दरम्यान इस्रायलनं त्यांच्या मृत्यूचा दावा केला असला तरी इराणने अद्याप या घटनेची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान बंदर अब्बासमधील या हल्ल्यामुळे या प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी एका इस्रायलच्या अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चे (IRGC) नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी यांचा अब्बास बंदर येथे झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या एका अहवालानुसार होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याची जबाबदारी तांगसिरी यांच्यावर होती. दरम्यान आपल्या प्रमुख कमांडरचा मृत्यू झाल्याने इराण याचे चोख प्रत्त्युत्तर देईल.

Iran Navy Commander Alireza Tangsiri Killed:
इराणचा इस्त्रायलवर भीषण हल्ला, इस्त्रायलवर तासाला 10 क्षेपणास्त्रांचा मारा

तांगसिरी इराणच्या सागरी सामर्थ्याचा चेहरा

प्राथमिक अहवालानुसार, कमांडर तांगसिरी एका महत्त्वाच्या मोहिमेवर होते त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. अलीरेझा तांगसिरी यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या आक्रमक सागरी धोरणाचे मुख्य शिल्पकार मानले जात होते. त्यांनी समुद्रात अमेरिका आणि इस्रायलला आव्हान देणारी निवेदने केली होती. आयआरजीसी नौदलाचे कमांडर म्हणून त्यांनी इराणची नौदल क्षमता मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com