अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं, इराणने आणलं अमेरिकेला गुडघ्यावर?

Iran Us Ceasefire Inside Story: इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर थांबलयं. या सगळ्यात अमेरिका झुकल्यानंच युद्धबंदी झाल्याचा दावा इराणनं केलाय..युद्ध थांबण्यामागची नेमकी इनसाईड स्टोरी काय आहे? अमेरिकेला युद्धबंदीसाठी पुढाकार का घ्यावा लागला, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Tensions ease in the Middle East as Iran and the US agree to a temporary ceasefire after intense negotiations.
Tensions ease in the Middle East as Iran and the US agree to a temporary ceasefire after intense negotiations.Saam Tv
Published On

अमेरिकेनं इस्त्रायलच्या मदतीनं इराणविरोधात युद्ध छेडलं...त्यामुळे जगात महायुद्ध भडकण्याची चिन्हं निर्माण झाली होती... इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखून जगाची नाकेबंदी केली होती... मात्र अखेर अमेरिका आणि इराणमध्ये हातात भिकेचा कटोरा घेतलेल्या पाकड्यांच्या मध्यस्थीनं 2 आठवड्यांची युद्धबंदी जाहीर करण्यात आलीय.....त्यासाठी इराणने अमेरिकेपुढे 10 अटी ठेवल्यात.... या अटींवर अमेरिका झुकल्यानंच युद्धबंदी झाल्याचा दावा इराणने केलाय.. मात्र हे युद्ध कसं थांबलं.. त्याची ही इनसाईड स्टोरी समोर आलीय.

युद्ध सुरु झाल्यापासून इराणचं नेतृत्व संपवलं... इराणचं सैन्य संपवलं... शस्त्रसाठा संपवला, अशा वल्गना करणाऱ्या ट्रम्प यांनी युध्दबंदीसाठी आठवडाभराची मुदत दिली होती.. त्याच दरम्यान होर्मुझ खुली करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीन आणि रशियाने व्हेटो वापरला... त्यामुळे अमेरिकेची कोंडी झाली.. आता नाचक्की टाळण्यासाठी इराणला दिलेली मुदत संपण्याआधीच ट्रम्प यांनी फोन फिरवला... पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी डेडलाईनच्या तीन तासांपुर्वी चर्चा केली... त्यानंतर ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहूंशी चर्चा केली... दुसऱ्या बाजूला मुनीर यांनी इराणी लष्करांसोबत चर्चा केली.. आणि इराणने दिलेला 10 अटींचा मसुदा ट्रम्प यांच्यापुढे ठेवला.. त्यानंतर अखेर या अटींवर सहमती दाखवत ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याची घोषणा केली...

आधी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यानंतर इराणने युद्धबंदीची घोषणा केली.. मात्र अमेरिकेनं पुन्हा कुरापत केली तर त्वेषानं उत्तर देणार, असं इराणनं स्पष्ट केलंय. आता मध्य-पूर्वेतील युद्ध तर थांबल असलं तरी महासत्ता अमेरिका बॅकफुटवर गेलीय.... त्यामुळे इराणनेच हे युद्ध जिंकल्याची चर्चा आहे.. आता 10 एप्रिलला कुरापतखोर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मध्यस्थीची चर्चा होणार आहे.. मात्र याआधी ज्या पद्धतीनं अमेरिकेनं इस्रायलनं कतारमध्ये चर्चेची फेरी सुरु असताना इराणवर हल्ला केला... त्यापद्धतीनं अमेरिका आणि इस्रायल दुबळ्या पाकच्या मध्यस्थीनं पुन्हा इराणविरोधात कुटील डाव टाकणार की अनेक दशकांपासून आखाती देशात सुरु असलेला युद्धाचा भडका विझून शांतता निर्माण होणार.. याकडे जगाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com