Iran vs Israel : इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प काय प्रत्युत्तर देणार?

Iran vs Israel News : इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आलाय. इराणच्या हल्ल्यानंतर ट्रम्प काय प्रत्युत्तर देणार, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
Iran vs Israel war
Iran vs Israel Saam tv
Published On

इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमध्ये मागील ११ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. अमेरिकेने शनिवारी रात्री उशिरा युद्धात उडी मारली. अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणुकेंद्रावर बॉम्ब हल्ले केले. त्यानंतर इराणने आता सीरियातील अमेरिकेतील लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्याचा घटनेला इराणच्या वृत्त संस्थेने दुजोरा दिला आहे.

Iran vs Israel war
Iran Israel Conflict Effect : इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका; भारतात काय काय महागणार? जाणून घ्या

इराणच्या Mehr News Agency ने दिलेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने अमेरिकेचं सीरियातील लष्करी तळ उद्ध्वस्त केलं आहे. इराणचे राजदूत आमिर सई इरावनी यांनी म्हटलं की, अमेरिकेने आमचं जितकं नुकसान केलं. आम्ही तितकंच नुकसान केलं आहे. इराण प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे'.

Iran vs Israel war
Mumbai News : मुंबईत भल्या पहाटे धावत्या एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; पर्स वाचवताना तोल गेला अन्..

इराणच्या जवळ असलेल्या इराकमध्ये अमेरिकेचं लष्करी तळ आहे. त्यानंतर सीरियात लष्करी तळ आहे. इराण आणि सीरियाचं अंतर ११०० किलोमीटरचं आहे. इराणने अमेरिकेच्या याच लष्करी तळावर हल्ला केला आहे. इराणच्या हल्ल्यात या लष्करी तळाचं किती नुकसान झालं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हल्ल्यावर अमेरिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, आता युद्ध आणखी तीव्र होऊ शकतं.

Iran vs Israel war
Pune News : पुण्यात भर रस्त्यात राडा! PMPML बस चालकाकडून प्रवाशाला बेल्टने मारहाण,VIDEO

दरम्यान, अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणुप्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या हल्ल्याआधी अणुप्रकल्पाचे युरेनियमचे साठे इतरत्र नेत्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणनेही हल्ला केला आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केला. इराणच्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com