

उत्तर प्रदेशमध्ये प्रशासकीय बदल्यांचा धडाका
२० आयपीएस आणि पीपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला
उत्तर प्रदेशमध्ये प्रशासकीय फेरबदलांचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएस अधिकारी आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आज पुन्हा उत्तर प्रदेश सरकारने २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बस्ती, जौनपूर आणि मऊपासून ते बलिया, बागपत, हापूडपर्यंत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने २० आयपीएस आणि पीपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जाहीर केले आहेत. आयपीएस आरआर २०२२ च्या बॅचचे आलोक राज नारायण यांची हरदोई येथे सहायक पोलिस अधीक्षक पदावरून मथुरा येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. पीपीएस संवर्गातील अधिकारी पूर्णेंदू सिंग यांची बागपत येथे पोलिस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
आझमगड येथे कार्यरत असलेल्या भूपेंद्र कुमार सिंग यांची हापूर येथे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मथुरा येथे कार्यरत असलेल्या सुरेश चंद्र रावत यांची बदली जालौनच्या एसपी पदी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, १९९६ आणि १९९८ च्या तुकडीतील २ अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. बहराइच, बस्ती, गोंडा आणि लखनऊ आयुक्तालयांमध्ये एसपी आणि डीसीपी स्तरावरही उत्तर प्रदेश सरकारने मोठे फेरबदल केले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने ३ ऑक्टोबर रोजी १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये दोन जिल्ह्यांचे मुख्य विकास अधिकारी, विविध विभागांचे सचिव आणि संचालक, तसेच दोन प्रमुख विद्यापीठांच्या कुलसचिवांचा समावेश होता. यामध्ये अनेक चर्चेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये लखनऊचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राकेश कुमार सिंह यांची गृहनिर्माण विकास परिषदेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नीरज शुक्ला यांची पंचायत राज विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. चंद्र भूषण यांची डॉ. राम मनोहर लोहिया प्रशासन अकादमीचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रकाश बिंदू यांची वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.