IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Uttar Pradesh IPS Officer Transfer: उत्तर प्रदेशमध्ये ३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,  कुणाची कुठे नियुक्ती?
IPS Officer TransferSaam Tv
Published On: 
  • उत्तर प्रदेशात ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • मनोज कुमार यांची मुरादाबादमध्ये बदली

  • हेमराज मीना यांची सुरक्षा मुख्यालयात बदली

  • राजेश द्विवेदी यांची निवडणूक कक्षात नियुक्ती

उत्तर प्रदेशमध्ये प्रशासकीय बदल्यांचा धडाका सुरूच आहे. उत्तर प्रदेसच्या गृहखात्यात सोमवारी रात्री उशिरा ३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. कोणत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कुठे बदली करण्यात आल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

प्रशासकीय बदल्यांनुसार, डॉ. मनोज कुमार, हेमराज मीना आणि राजेश द्विवेदी यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या फेरबदलामुळे मोरादाबाद येथील पीएसी पश्चिम विभागापासून ते लखनऊ येथील सुरक्षा मुख्यालय आणि डीजीपी मुख्यालयातील निवडणूक कक्षापर्यंतच्या जबाबदाऱ्यांचा यात समावेश आहे.

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,  कुणाची कुठे नियुक्ती?
IPS Transfer: १८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस दलात मोठा फेरबदल

सध्या उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाशी संलग्न असलेले पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार यांची पीएसी पश्चिम विभाग, मोरादाबाद येथे बदली करण्यात आली आहे. डॉ. मनोज कुमार बऱ्याच काळापासून बदलीच्या प्रतीक्षेत होते. मनोज कुमार हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते लखनऊ येथील डीजीपी मुख्यालयात प्रतीक्षा यादीत होते.

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,  कुणाची कुठे नियुक्ती?
IAS अन् IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या कोण करतं? कोणाकडे आहे इतकी मोठी पॉवर?

लखनौ येथील उत्तर प्रदेश राज्य न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमराज मीना यांची देखील बदल करण्यात आली आहे. हमराज मीना यांची उत्तर प्रदेश सुरक्षा मुख्यालयात पोलिस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. हेमराज मीना हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

अलीगढ येथील ३८ व्या बटालियन पीएसीचे कमांडर आणि आयपीएस अधिकारी राजेश द्विवेदी यांची उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयांतर्गत लखनऊ येथील पोलिस अधीक्षक (निवडणूक कक्ष) पदावर बदली करण्यात आली आहे. राजेश द्विवेदी हे २०१३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,  कुणाची कुठे नियुक्ती?
पोलिस विभागात मोठे खांदेपालट! 23 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांचं गृह विभागात ऑपरेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com