Earthquake News : इंडोनेशिया हादरलं! ७.७ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के; २० जणांचा मृत्यू

Indonesia Earthquake Death Update news : इंडोनेशियातील फ्लोरेस बेटाला ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार धक्का बसला. २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इमारतींचे नुकसान आणि त्सुनामीच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ.
Indonesia 7.7 Magnitude Earthquake Hits Flores Island | Latest News
Indonesia 7.7 Magnitude Earthquake Hits Flores Island | Latest NewsSaam Tv
Published On
Summary
  • इंडोनेशियातील फ्लोरेस बेटाला ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

  • भूकंपामुळे २० जणांचा मृत्यू

  • काही किनारी भागांत समुद्र खवळल्याने त्सुनामीची भीती

  • इमारतींचे नुकसान झाल्याचे व्हिडिओ समोर

इंडोनेशियातून मोठी बातमी समोर आली आहे. इंडोनेशियातील फ्लोरेस बेट भूकंपाने हादरले. आज सकाळच्या सुमारास हे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी आहे. भूकंपामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक जखमी झाल्याचेही समोर आले आहे. जीवितहानीसोबतच वित्तहानी झाल्याचीही माहिती आहे.

अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ६ वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू एंडे शहरापासून सुमारे ६८ किलोमीटर अंतरावर समुद्राखाली होता. एका मोठ्या धक्क्यानंतर ५.९,५.६ आणि ६.१ तीव्रतेचे सौम्य धक्के नोंदवण्यात आले. भूकंपानंतर काही किनारी भागांमध्ये समुद्र खवळल्याचे दिसून आले. नागेकेओ परिसरातील नागरिकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्सुनामीची भीती निर्माण झाली आणि अनेकांनी सुरक्षिततेसाठी किनारी भागातून पळ काढला. सुरुवातीला काही किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र, काही तासांनंतर हा इशारा मागे घेण्यात आला.

Indonesia 7.7 Magnitude Earthquake Hits Flores Island | Latest News
Sleep Tips : तुमचा नवरा रात्री झोपेत बडबड करतो का? 'हे' ७ उपाय आजच करा

दरम्यान, सोशल मीडियावर भूकंपामुळे इमारतींचे नुकसान झाल्याचे आणि काही इमारती कोसळल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. सिक्का येथील सेंट पीटर मेजर सेमिनरीमध्ये सकाळची प्रार्थना सुरू असताना सभागृहाच्या छताचा काही भाग कोसळला. घाबरलेले विद्यार्थी बाहेर धावले. जीव वाचवण्यासाठी एकाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली.

Indonesia 7.7 Magnitude Earthquake Hits Flores Island | Latest News
Amrut Bharat Express : रेल्वेचा मोठा निर्णय! देशात धावणार नव्या ७ अमृत भारत एक्स्प्रेस, मुंबईसह 'या' स्थानकांवर थांबणार

भूकंपानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रुग्णालयांमधील रुग्णांना बाहेर काढण्यात आले. रुग्णालयांच्या बाहेर स्ट्रेचर, ऑक्सिजन सिलिंडर आणि आयव्ही स्टँडची व्यवस्था करून काही ठिकाणी मोकळ्या जागेत उपचार सुरू करण्यात आले. अधिकाऱ्यांनी नागरिकांना नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के पुन्हा बसू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com