Indigo Airline : इंडिगो-एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांची एकमेकांना धडक, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

Air India Express : कोलकाता विमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली. धावपट्टीवरून जात असताना इंडिगोचे विमान पार्क केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला धडकले. मात्र सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.
Indio Airline
Indio Airline Saam Digital

Indio Airline

कोलकाता विमानतळावर बुधवारी मोठा विमान अपघात टळला. धावपट्टीवरून जात असताना इंडिगोचे विमान पार्क केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला धडकले. एअर इंडिया एक्स्प्रेसचे हे विमान कोलकाताहून चेन्नईला जाण्याच्या तयारीत होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. त्याचवेळी, हवाई वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कारवाई करत इंडिगो पायलटना रोस्टरमधून काढून टाकलं आहे. डीजीसीएने याप्रकरणी सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

बुधवारी सकाळी कोलकाता विमानतळावर हा अपघात झाला. त्यावेळी इंडिगो विमान टॅक्सी मार्गावरून धावपट्टीवरून जात होते. यादरम्यान विमानाचा काही भाग धावपट्टीवर उड्डाणाच्या तयारीत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धडकला. DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगो A320 VT-ISS विमानाने एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 737 VT-TGG ला धडक दिली. दरम्यान इंडिगोच्या दोन्ही पायलटवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indio Airline
Arvind Kejriwal: दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना झटका; ३ एप्रिलला होणार सुनावणी

एअर इंडिया एक्स्प्रेसचं स्पष्टीकरण

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने एएनआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विमान चेन्नई, तामिळनाडूला जाण्यासाठी कोलकाता विमानतळाच्या रनवेवर क्लिअरन्सची वाट पाहत होते. यादरम्यान इंडिगो एअरलाइनच्या विमानाच्या पंखाचा एक भाग एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला धडकला. अपघातानंतर विमान परत करण्यात आले. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

Indio Airline
CR Kesavan Join BJP: काँग्रेसला मोठा धक्का! भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या पणतूचा भाजपमध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com