New Delhi: काँग्रेसचे माजी नेते, भारताचे पहिले गव्हर्नर सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केशवन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सीआर केशवन यांनी शनिवारी भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश केला आहे. केशवन यांनी फेब्रुवारीमध्येच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. (Latest Marathi News)
केसीआर केशवन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी माझ्या घरातील अशा लोकांना ओळखतो, की त्यांना पीएम आवास योजनेच्या माध्यमातून चांगले घरे मिळाली आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन कोटी जणांना घरे मिळाली आहेत'.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकदा सांगितले होते की, डीबीटी हे आधी 'डीलर ब्रोकर ट्रान्सफर' होतं. आता ते 'डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर' झालं आहे. याआधी डीलरच्या मदतीने घरे दिली जात होती. आता मात्र, थेट पात्र लोकांना घरे मिळत आहेत, असेही केशवन म्हणाले.
सीआर केशवन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सोपावला आहे. या राजीनाम्यात केशनवन यांनी म्हटलं की, 'मी पक्षात दोन दशकापासून काम करत होतो. पण आता पक्षातील तत्वांमध्ये फरक दिसून येत आहे. त्यामुळे पक्षात काम करण्याची इच्छा राहिली नाही'.
केशवन यांनी पुढे म्हटलं की, 'या कारणामुळे मी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर कोणत्याही कार्यक्रमाची जबाबदारी उचलली नाही. त्याचबरोबर भारत जोडो यात्रेतही सामील झालो नाही. आता नव्या मार्गाने पुढे जाणार आहे. त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे' केशवन यांनी तमिळनाडू काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी पदाचा देखील राजीनामा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.