Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! काउंटरवरून तिकीट काढणाऱ्यांनाही मिळणार १० लाखांचा विमा, काय आहे योजना?

Railway Insurence News : रेल्वे काउंटरवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास विम्याची सुविधा, ४५ पैशांचा प्रीमियम, १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण, पात्रता, डिजिटल पेमेंट आणि विम्याच्या अटी जाणून घ्या.
Railway Insurence News
Railway Insurence News AI Image
Published On: 
Summary
  • रेल्वे प्रवास विम्यासाठी प्रति प्रवासी ४५ पैसे आकारले जाणार

  • ऑनलाइन बुकिंगसोबतच रेल्वे आरक्षण खिडकीवरून तिकीट घेणाऱ्या पात्र प्रवाशांनाही विमा संरक्षण देण्याची योजना

  • मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वासाठी नमूद केलेली विमा रक्कम

रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना प्रवास विम्याची सुविधा मिळत होती. आता हीच सुविधा रेल्वेच्या तिकीट बुकिंग केंद्रावरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनाही मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतल्याची माहिती असून, आजपासून म्हणजेच २७ ऑक्टोबर २०२६ पासून या सुविधेची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या निर्णयामुळे रेल्वे स्टेशनवरील आरक्षण खिडकीतून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही प्रवासादरम्यान अपघात झाल्यास आर्थिक संरक्षण मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रेल्वेने ऑफलाइन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनाही विमा योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. रेल्वे प्रवास विम्यासाठी प्रवाशांना प्रति व्यक्ती केवळ ४५ पैसे प्रीमियम भरावा लागेल. ही रक्कम फार कमी असली तरी अपघातात झालेल्या नुकसानाची भरपाई देणारी ठरू शकते. याने प्रवाशांना आर्थिक मदत मिळेल. मात्र अपघाता कशाप्रकारे झाला आहे, यावर नुकसानाची ठरावीक मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते.

Railway Insurence News
Weather Alert : ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

विम्यांतर्गत मिळणारे संरक्षण पुढीलप्रमाणे :

  • मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व: १० लाख रुपये

  • कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व: ७.५ लाख रुपये

  • जखमी झाल्यास रुग्णालयाचा खर्च: २ लाख रुपयांपर्यंत

  • मृतदेह वाहतुकीचा खर्च: १० हजार रुपये

  • प्रत्यक्ष विमा संबंधित योजनेच्या नियमांनुसार आणि अटींनुसार दिला जाईल.

Railway Insurence News
Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

विमा घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत?

रेल्वे काउंटरवरून तिकीट घेताना विमा संरक्षण हवे असल्यास प्रवाशांना डिजिटल पद्धतीने पैसे भरावे लागतील. रोख रक्कम देऊन तिकीट खरेदी करणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तिकीट आरक्षित करताना योग्य मोबाइल क्रमांक आणि आवश्यक माहिती देणेही महत्त्वाचे आहे.तिकीट रद्द केल्यास भरलेला विमा प्रीमियम पूर्णपणे परत मिळणार नाही. ४५ पैशांपैकी ९ पैसे कपात केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Railway Insurence News
Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

कोणत्या प्रवाशांना मिळणार लाभ?

ही सुविधा आरक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी असून, बुकिंगच्या वेळी तिकीट कन्फर्म किंवा RAC असणे आवश्यक आहे. एकाच PNR वर अनेक प्रवासी असतील आणि त्यापैकी काहींची तिकिटे प्रतीक्षा यादीत असतील, तरी योजनेच्या अटी पूर्ण झाल्यास सर्व पात्र प्रवाशांना विमा संरक्षण मिळू शकते. पाच वर्षांखालील मुलांना या विम्याचा लाभ लागू होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com