Israel-Hamas War: भारतीय वंशाच्या दोन इस्राइल महिला सैनिकांचा मृत्यू; महाराष्ट्राच्या लेकीचा मृत्यू

Israel-Hamas War: इस्राइल आणि हमासच्या युद्धात भारतीय वंशाच्या महिला सैनिकांचा मृत्यू झालाय.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarSaam Tv
Published On: 

Israel-Hamas War:

इस्राइल आणि हमासमधील युद्ध शिगेला पोहोचलं असून यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. या युद्धाचा आज १० वा दिवस असून यात भारतीय वंशाच्या महिला सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यातील एक महिला सैनिक मूळ महाराष्ट्राची असलल्याचं सांगितलं जात आहे. इस्राइल सैन्य आणि भारतीय समुदायाने या बातमीला दुजोरा दिलाय. (Latest News)

युद्धात मृत्यू पावलेल्या महिलांची सैनिकांची नावे लेफ्टनंट ऑर मेसेस (वय २२) तसेच इन्स्पेक्टर कीम डोक्राकर अशी आहेत. यापैकी मोसेस ही होम फ्रन्ट कमांड तर कीम डोक्राकर बॉर्डर पोलीस ऑफिसमध्ये तैनात होत्या. ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात या दोघांचा मृत्यू झाला. हमाससोबत झालेल्या युद्धात आत्तापर्यंत २८६ सैनिक आणि ५१ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हमासच्या हल्ल्यांमध्ये मूळ भारतीय असलेल्या लोकांच्या मृत्यूंची संख्या वाढू शकते असं भारतीय वंशाच्या समुदायानं म्हटलंय. यापैकी काही जणांची अद्याप ओळखही पटलेली नाही. काही वर्षांपूर्वी भारतातील लोक इस्राइलला स्थायिक झाले. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या या इस्राइलमध्येच जन्मल्या. त्यामुळं त्यांना इस्राइलचं नागरिकत्व मिळालं आहे. पण यातील बहुतांश भारतीय लोक हे इतर धर्माचे होते त्यांना इस्राइलमध्ये स्थायिक झाल्यानंतर ज्यू धर्म स्वीकारला. याचप्रकारे इस्राइलकडून लढताना मृत्यू पावलेल्या या दोन महिला देखील धर्माने ज्यू होत्या.

Israel-Hamas War
BRS Morcha : शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीचा तुमसरला माेर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.