BRS Morcha : शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीचा तुमसरला माेर्चा

या माेर्चा दरम्यान पाेलीसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता.
bhandara
bhandarasaam tv
Published On

- शुभम देशमूख

Bhandara News : शेतकरी, शेतमजूर यांच्या विविध मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने आज (साेमवार) तुमसर येथील उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या माेर्चात हजारो शेतकरी शेतमजूर सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

bhandara
Crime News : आर्मीत भरतीच्या आमिषाने 42 युवकांची पावणेदोन कोटींची फसवणूक, तासगावातून एकास अटक

देशात कोरोना महामारी व त्यानंतर राज्यातील सत्ता नाट्य यांचे परिणाम राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, युवा ,बेरोजगार, विद्यार्थी ,महिला, गोरगरीब सामान्य कष्टकरी यांच्या मूलभूत गरजाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असा आराेप बीआरएसने केले आहे.

bhandara
Durga Mata Daud Kasaba Bawada: हिंदुत्ववाद्यांची समजूत काढत पाेलीसांनी कसबा बावड्यातील परिस्थिती हाताळली, दूर्गादाैड मार्गावर नेमकं काय घडलं?

यामुळे जनतेची होणारी आर्थिक, सामाजिक कोंडी फोडण्यासाठी शासनाचे जनतेच्या न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज बीआरएसच्या वतीने उपविभागीय कार्यालय तुमसरवर धडक मोर्चा (morcha) काढण्यात आला.

शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे प्रति एकर दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांना बाराही महिने 24 तास उच्च दर्जाची वीज मोफत देण्यात यावी. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या पाच लक्ष रुपयांचा विमा काढण्यात यावा.

तेलंगणा राज्याप्रमाणे दलित बंधू योजना सुरू करून रोजगारांसाठी दहा लक्ष रुपये बिना परतावा देण्यात यावे. आदिवासी लोकांना रोजगारासाठी दहा लाख रुपये विनापरतावा देण्यात यावे. शेतकऱ्यांचा कर्जमाफ करण्यात यावा असा विवीध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला अशी माहिती चरण वाघमारे (विदर्भ संघटक भारत राष्ट्र समिती) यांनी दिली. या माेर्चात हजारो शेतकरी शेतमजूर सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

bhandara
Trains Cancelled : 17 ऑक्टोबरपर्यंत शालीमार एक्सप्रेस रद्द, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com