भारतीय वायूसेनेचं विमान थेट तलावात, भीषण स्फोट अन् धुराचे लोट; पाहा थरारक VIDEO

Indian Air Force Training Aircraft Crash In Prayagraj Lake: प्रयागराज येथे भारतीय वायूसेनेचे प्रशिक्षणार्थी विमान तलावात कोसळल्याची घटना घडली आहे. भीषण स्फोटासह धुराचे लोट पसरले.
Smoke billows after an Indian Air Force training aircraft crashed into a lake near K.P. College in Prayagraj, Uttar Pradesh.
Smoke billows after an Indian Air Force training aircraft crashed into a lake near K.P. College in Prayagraj, Uttar Pradesh.AI
Published On

उतरप्रदेश येथे बुधवारी एक मोठी घटना घडली आहे. राज्यातील प्रयागराज येथे भारतीय वायूसेनेच्या विमानाचा अपघात झाला आहे. हवाई दलाचं विमान थेट तलावात कोसळल्याची घटना घडली आहे. शहराच्या अगदी मधोमध असलेल्या एका शहरात ते कोसळले. ही घटना प्रयागराजमधील केपी कॉलेजच्या मागे असलेल्या तलावामध्ये दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. वायूसेनेचे हे एक प्रशिक्षणार्थी विमान असल्याचे समोर येत आहे. विमान कोसळताच भीषण स्फोट झाला.

या अपघात घडताच आजबाजूचे नागरिक सैरावैरा पळायला लागले तर काहीजणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. विमान कोसळण्याआधी दोन जणांनी पॅरॅशूटच्या माध्यमातून उडी मारली. यावेळी त्यांना स्थानिकांना वाचवले.

Smoke billows after an Indian Air Force training aircraft crashed into a lake near K.P. College in Prayagraj, Uttar Pradesh.
US Vs Iran: अमेरिका 48 तासात इराणवर करणार हल्ला? चीनची इराणला लष्करी मदत?

हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी पोलीस अग्निशमन दलास माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक प्रशासन आणि बचावकार्य सुरू केले. उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, कॉलेजममध्ये असताना अचानक मोठा आवाज आला आणि आम्ही आवाज ज्या दिशेने आला त्याठिकाणी गेलो असता दोन जण फसलेले दिसले. यावेळी त्यांनी त्या दोनजणांना तलावातून बाहेर काढले.

Smoke billows after an Indian Air Force training aircraft crashed into a lake near K.P. College in Prayagraj, Uttar Pradesh.
Shiv Sena : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने पायलट आणि त्याच्या साथीदाराला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायूसेनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विमान तलावावर पडताच मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोट पसरू लागले, यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. प्रयागराज येथे सुरू असलेल्या माघ मेळा परिसरापासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर झालेल्या या अपघातामुळे प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com