Office Romance: डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर, संशोधनातून थक्क करणारे आकडे समोर

Relationship Trends: भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०% भारतीयांनी कधी ना कधी सहकर्मचाऱ्यांसोबत रिलेशन ठेवले आहे. बदलती मानसिकता आणि ओपन रिलेशनशिपची वाढ स्पष्ट दिसते.
Relationship Trends
Office Romancesaam tv
Published On

कामाच्या ठिकाणी प्रेमसंबंध ही नवी गोष्ट नाही, पण भारतात हे संबंध मोठ्या संख्येने दिसत असल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय रिसर्चमधून समोर आला आहे. एशली मॅडिसन या सिक्रेट नातेसंबंधांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्लॅटफॉर्ममधील युगोव्हच्या सहकार्याने जगातील ११ देशांमध्ये हा रिसर्च केला. यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रिसर्चमधल्या यादीत मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि यूएस या ११ देशांमधील एकूण १३,५८१ प्रौढ व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार भारतीयांमध्ये ऑफीसमध्ये रिलेशनशिप मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र अनेक कंपन्या व्यावसायिक मर्यादा आणि वर्तनाच्या बाबतीत जागरूक होत आहेत.

Relationship Trends
Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

या रिसर्चमध्ये असे आढळले की, भारतातील दहा पैकी चार जणांनी कधी ना कधी आपल्या सहकर्मचाऱ्यासोबत रिलेशनशिप ठेवले आहे किंवा सध्या ते सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. मेक्सिकोमध्ये हे प्रमाण ४३ टक्के आहे, तर भारतात ४० टक्के असल्याचे दिसले. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा सारख्या देशांत हे प्रमाण केवळ ३० टक्के आहे.

यामध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे पुरुषांनी महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात सहकर्मचाऱ्यांसोबत प्रेमसंबंध ठेवले आहेत. पुरुषांचे प्रमाण ५१ टक्के तर महिलांचे ३६ टक्के आहे. यामुळे ऑफिस रिलेशनशिपमध्ये पुरुष जास्त जोखीम घेतात असे आढळले आहे.

महिलांचा एक वेगळा दृष्टिकोनही समोर आला. जवळपास २९ टक्के महिलांचे मत आहे की, करिअरवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्या ऑफिस रिलेशनपासून दूर राहतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण २७ टक्के आहे. उलट पुरुषांना वैयक्तिक आयुष्य बिघडण्याची अधिक भीती वाटते. त्यापैकी ३० टक्के पुरुषांनी हे कारण सांगितले, तर महिलांमध्ये हे प्रमाण २६ टक्के आहे.

या अभ्यासातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, तरुण पिढी ऑफिस रिलेशनबाबत जास्त सावध आहे. १८ ते २४ वयोगटातील ३४ टक्के तरुणांना अशा नात्यांमुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो याची अधिक चिंता वाटते. भारत ऑफिस रोमॅन्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर येण्याचे कारण म्हणजे वाढती सामाजिक मोकळीक आणि नात्यांबाबतचे बदलते दृष्टिकोन. 'ओपन रिलेशनशिप' ही संकल्पना भारतात झपाट्याने स्वीकारली जात असल्याचे दिसते.

ग्लीडेन या डेटिंग अॅपच्या सर्वेक्षणात ३५ टक्के भारतीय सध्या ओपन रिलेशनशिपमध्ये असल्याचे, तर ४१ टक्के लोकांनी जोडीदाराने सांगितल्यास अशी नाती स्वीकारण्याची तयारी असल्याचे सांगितले. ही प्रवृत्ती फक्त मोठ्या शहरांमध्ये नाही, तर छोट्या शहरांमध्येही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे कांचीपुरम हे शहर भारतात एक्स्ट्रा-मॅरिटल रिलेशनशिपबाबत जास्त उत्सुकता दाखवणारे शहर म्हणून समोर आले आहे. भारतामध्ये बदलत जाणाऱ्या नातेसंबंधांच्या स्वरूपाचा हा एक महत्त्वपूर्ण संकेत मानला जात आहे.

Relationship Trends
Jowar Bhakri: कोणत्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाणं टाळावे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com