
हतबल पाकिस्तान आता चीनच्या पाठीवर बंदूक ठेवून गोळ्या चालवत असल्याचं दिसतंय. होय आणि या पाकिस्तान्यांनी आता तुम्ही जर सिंधूचं पाणी अडवलं तर आम्ही ब्रम्हपुत्रेचं पाणी अडवू अशी फुशारकी मारलीये. परंतू पाकची ही हुशारी आणि फुसकी फुशारकी उघड झालीये.
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचं पाणी
हतबल पाकिस्ताननं भारतापुढे सपशेल गुडघे टेकल्यानंतर आता मात्र चीनच्या काठीनं साप मारण्याचा प्रकार पाकिस्तानी करतायेत. कारण सिंधू जल करार थांबवून भारतानं पाकचा घसा कोरडा केलाय. आणि म्हणूनच पाकनं आता चीनमध्ये उगमस्थान असलेली ब्रम्हपुत्रा नदीतील पाणी अडवण्याची फुशारकी मारलीये.
पाकनं काय पोकळ धमकी दिलीये
जर भारत सिंधू जल करार रोखू शकतो आणि सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देण्यापासून रोखतो, तर चीनही ब्रह्मपुत्र नदीचे पाणी भारताला देण्यापासून रोखू शकतो. - राणा एहसान अफजल, विशेष सहाय्यक, पाक पंतप्रधान यांनी असं म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या या धमकीची आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हवा काढलीये. कारण ज्या ब्रम्हपुत्रेचं पाणी अडवण्याच्या बाता पाकिस्तान करतोय. त्या ब्रम्हपुत्रेवर पुर्ण भारत अवलंबून नाही हेही या पाकिस्ताननं लक्षात ठेवावं.
ब्रम्हपुत्रेचा उगम चीननं कब्जा केलेल्या तैवानमध्ये
आजवर चीननं पाकला कर्ज देऊन त्यांच्या भूभागावर वाकडी नजर ठेवलीये. पाकिस्तानच्या दहशतवादाला त्यांनी कधीच पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर कुठलाही वाद नसतांना चीन या पाकाड्यांच्या नादी लागून ब्रम्हपुत्रेचं पाणी अडवेल असं म्हणणं अतिशयोक्ती ठरते. आणि जर चीननं पाणी अडवलंच तर त्या पाण्यापासून भारताचं काहीच अडत नाही हे सुर्य प्रकाशा इतकं स्पष्टयं. मात्र भारताची गोची करण्याचा हा प्रयत्न म्हणजे आपलं घर भट्टी, अन दुसऱ्याच्या घरात वादळ निर्माण करण्याचा आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.