Weather Update: महाराष्ट्रासह पाच राज्यात मुसळधार पावासाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या कोणत्या भागात कोसळणार पाऊस?

IMD Issues Heavy Rain Warning: सक्रिय नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, पश्चिमी वाऱ्यांमुळे उत्तर भारतात दोन दिवसांचा पाऊस पडणार आहे.
IMD Issues Heavy Rain Warning:
The India Meteorological Department has forecast moderate to heavy rainfall in Maharashtra, Karnataka, Telangana, Andhra Pradesh and Tamil Nadu.saam tv
Published On
Summary
  • नैऋत्य मान्सूनने केरळसह दक्षिण भारतातील अनेक भाग व्यापले

  • महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार पावसाचा इशारा

  • उत्तर भारतात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

नैऋत्य मान्सूनने भारतीय द्वीपकल्पात लक्षणीय प्रगती केली आहे. हे वारे भारताच्या विविध भागात पोहोचले आहेत. केरळमध्ये धडकल्यानंतर, मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापले आहे. यासह कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये प्रवेश केला आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, नैऋत्य मान्सून त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप सक्रिय होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे येत्या काही दिवसांत दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Issues Heavy Rain Warning:
Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. संपूर्ण केरळ आणि गोवा ते मुंबईपर्यंत, तसेच कर्नाटक आणि केरळच्या काही भागांसह भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

IMD Issues Heavy Rain Warning:
Maharashtra Weather: मान्सून 48 तासात तळकोकणात धडकणार, महाराष्ट्र कधी व्यापणार?

त्याचवेळी ईशान्य भारतातील हवामान सक्रिय होत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत मान्सूनचा हंगाम ईशान्येकडील आघाडीवर पूर्णपणे पुढे सरकेल.

उत्तर भारतात दोन दिवस मुसळधार पावसाचे सावट

पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. दरम्यान पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव मैदानी प्रदेशात पसरणार असून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येईल असा अंदाज आहे. जोरदार वारे सुटले तरी उत्तर भारतीय प्रदेशात ७ जूनपासून पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, हवामानशास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवलाय.

मध्य आणि पूर्व भारतात संमिश्र हवामान असेन

भारताच्या मध्य आणि पूर्व भागांमध्ये संमिश्र हवामान राहील. यासह भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि जबलपूर यांसारख्या मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील; त्यामुळे वातावरण थंड होण्यास मदत होईल. याउलट पूर्व भारतात सध्या तरी मान्सूनचा पाऊस पडणार नाही. बिहारच्या उत्तरेकडील आणि डोंगराळ भागांमध्ये ६ जूनपासून पावसाच्या सरी वाढतील. आणि बिहारच्या दक्षिणेकडील प्रदेशात हवामान कोरडे आणि उष्णच राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com