India Slams Pakistan: 'POK रिकामा करा, दहशतवाद, अत्याचार थांबवा...' भारताने पाकिस्तानला ठणकावले

India Vs Pakistan: जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले
Petal Gahlot in UNGA
Petal Gahlot in UNGASaamtv
Published On: 

India Hits Out Pakistan at UNGA :

यूएनजीएच्या दुसऱ्या समितीच्या बैठकीत काश्मिरच्या मुद्द्यावरुन भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले. जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले.

Petal Gahlot in UNGA
Nandurbar News : अंधश्रद्धेतून महिलेस ठरविले डाकीण, Saam TV समोर अंगावर शहारे आणणारा प्रसंग कुटुंबाने केला कथन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या सत्राला संबोधित करताना पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वारुल हक यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण आणि मजबूत संबंध हवे आहेत, असा दावा अन्वर उल हक काकड यांनी केला.

त्यांच्या या विधानाला भारताच्या वतीने पेटल गेहलोत यांनी उत्तर दिले. "पाकिस्तान हा नेहमीच गुन्हेगार बनला आहे. या मंचाचा गैरवापर करण्यासाठी पाकिस्तान प्रसिद्ध आहे. पाकिस्तान या जागतिक संघटनेच्या व्यासपीठाचा भारताविरुद्ध वारंवार दुरुपयोग करत आहे आणि पाकिस्तानच्या या कृतीची संपूर्ण जगाला कल्पना आहे... अशा शब्दात गेहलोत यांनी सुनावले.

तसेच जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो, जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित प्रकरणे पूर्णपणे अंतर्गत आहेत. पाकिस्तानला आमच्या देशांतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही... असेही गेहलोत यांनी सुनावले. (Latest Marathi News)

Petal Gahlot in UNGA
Amit Shah News: मुंबई दौऱ्याआधी अमित शहांचं मराठीत ट्वीट; म्हणाले, 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com