IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

Weather Update: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांत ताशी ६० किमी वेगाने वारे वाहू शकतात.
IMD weather warning for rain and thunderstorms across India
IMD weather warning for rain and thunderstorms across India
Published On: 
Summary
  • अनेक राज्यांत पाऊस आणि वादळी हवामानाची शक्यता

  • मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडण्याचा अंदाज

  • काही भागांत ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस, वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार बुधवारी किमान १७ राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांचा समावेश आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातही पाऊस होईल अशी शक्यता आहे.

यासह अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. हे वादळी वारे जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा या राज्यात वाहतील.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण भारतातील तमिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस होईल. ईशान्येकडील अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. दिल्लीमध्ये कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता

पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडू शकतो. मात्र १४ ऑक्टोबरसाठी संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये. १५ ऑक्टोबर रोजी पश्चिम भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहण्याचा अंदाज आहे. सोसाट्याच्या वारे ताशी ५० किमीने वेगाने वाहतील. १४ ऑक्टोबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची विशेष शक्यता नाही; मात्र, १६ ऑक्टोबर रोजी तेथे काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

बिहारमध्ये १४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. राज्यात पाऊस, वादळ किंवा सोसाट्याच्या वाऱ्यांबाबत कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, आगामी दिवसांत हवामानात बदल होऊ शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये पावसासह गारपिटीची शक्यता

पूर्व आणि पश्चिम राजस्थानमधील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान पूर्व राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह विजा चमकण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे तो ताशी ५० किमीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच, १४ ऑक्टोबर रोजी पश्चिम राजस्थानमध्येही पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

बुधवारी हिमाचल प्रदेशातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवलाय. १४ ऑक्टोबर रोजी काही भागांत गारपीटही होऊ शकते. या दिवशी संपूर्ण राज्यासाठी मुसळधार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये.

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज

१४ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो आणि वाऱ्याचे झोत ताशी ६० किमी वेगापर्यंत पोहोचू शकतात

सातारा, बीड आणि जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांत उष्ण आणि दमट उष्णतेचा इशारा देण्यात आलाय. तर पुणे घाटमाथा, रायगड, पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, बीड आणि जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. राज्यात गुरुवारपासून दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com