Heavy Rainfall Alert : धडकी भरवणारा अलर्ट! पुढील ७ दिवस १७ राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार

Weather forecast, IMD Alert : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसानं पाठ फिरवली असली तरी, पुढील आठवडा अत्यंत महत्वाचा आहे. १७ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील १७ राज्यांमध्ये ११ ते १७ जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
Rain Alert UpdateYandex
Published On

सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा अलर्ट भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ११ ते १७ जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि नैऋत्येकडील अनेक राज्यांसाठी पुढील सात दिवसांसाठी हा अलर्ट देण्यात आला आहे.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पूर्वमोसमी पावसानं महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत धुमाकूळ घातला होता. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अवेळी नकोशा असलेल्या पावसानं सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना हैराण केलं. यंदा मान्सूनचं आगमन लवकर झालं. आता बरसात होऊन उकाड्यापासून दिलासा मिळेल, या विचारानं सर्वांनीच आकाशात जमा होणाऱ्या गडद ढगांकडे चातकासारखे डोळे लावले होते. पण पावसानंही पाठ फिरवली. त्यामुळं पदरी निराशाच पडली. अनेक भागात शेतीची कामंही रखडली आहेत. पावसाच्या हलक्या सरी कोसळून दिलासा मिळेल, असं अपेक्षित आहे. मात्र, हवामान खात्यानं पावसाबाबत दिलेल्या ताज्या अलर्टनं सगळ्यांचीच झोप उडाली आहे.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात धुमाकूळ घालणारा पाऊस जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी हवा तसा पडला नाही. मात्र, पुढील आठवडा अत्यंत महत्वाचा आहे. देशातील १७ राज्यांना हवामान खात्यानं अलर्ट दिला आहे. या १७ राज्यांमध्ये पुढील आठवडाभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्याचाही इशारा दिला आहे.

केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं हवामान खात्यानं तेथील स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले आहे. जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून सज्ज राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह उत्तरेकडील, तसेच नैऋत्येकडील काही राज्यांत वादळी वाऱ्यांसह गारपीटीचाही इशारा दिला आहे.

कोणत्या दिवशी कुठे मुसळधार पाऊस?

११ जून -

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटकातील दक्षिण भाग, तामिळनाडू, पुद्दूचेरी

- या भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. या दरम्यान, विजांचा कडकडाट आणि गारपीटीची शक्यता. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडील भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. झारखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता.

१२ जून -

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुद्दूचेरी.

मुसळधार पाऊस. उत्तर प्रदेशातील पूर्व भागात ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पाऊस. बिहारमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे, झारखंडमध्ये विजांचा कडकडाट.

१३ आणि १४ जून -

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटकातील काही भाग, केरळ, माहे, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तामिळनाडू, पुद्दूचेरी, तेलंगण

मुसळधार पाऊस. उत्तर प्रदेशातील उत्तरेकडील भागात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस. बिहारमध्ये वाऱ्यांचा वेग प्रतितास ३० ते ४० किलोमीटर. झारखंडमध्ये विजांचा कडकडाट आणि पाऊस.

देशातील १७ राज्यांमध्ये ११ ते १७ जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
Rain Alert: पावसाळी अलर्ट म्हणजे नेमकं काय? या काळात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

हवामान खात्याचा १७ जूनसाठी अलर्ट

कर्नाटकाचा किनारी प्रदेश, तसेच दक्षिण भाग, तामिळनाडू, पुद्दूचेरी.

काही भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटकातील उत्तरेकडील भाग, ओडिशा, उत्तराखंड, विदर्भ.

विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

राजस्थान -

५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे.

हरयाणा, छत्तीसगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड

विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

नैऋत्येकडील काही राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये अलर्ट.

देशातील १७ राज्यांमध्ये ११ ते १७ जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला, आठवडाभर धो-धो बरसणार, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट; IMDचा अंदाज काय सांगतो?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com