Rain Alert: पावसाळी अलर्ट म्हणजे नेमकं काय? या काळात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

पावसाळी अलर्ट

पावसाळी अलर्ट म्हणजे हवामान विभागाने जोरदार पाऊस, वादळ किंवा इतर धोक्यांच्या शक्यता दर्शविण्यासाठी जारी केलेले एक विशेष अलर्ट आहे.

Weather Alert | Freepik

नागरिकांना जागरूक करतो

पावसाळ्याच्या काळात संभाव्य जोरदार पावसाने होणाऱ्या धोका, पूर, गळती किंवा अन्य आपत्तींविषयी नागरिकांना जागरूक करतो.

Weather Alert | Freepik

रेड अलर्ट

या अलर्टमध्ये अतिशय जोरदार असा पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता असते. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

Weather Alert | Freepik

ऑरेंज अलर्ट

या अलर्टमध्ये जोरदार पाऊस आणि वादळ अपेक्षित आहे. नागरिकांनी घरात राहण्याचा प्रयत्न करावा, तसेच अनावश्यक प्रवास टाळावा.

Weather Alert | Freepik

येलो अलर्ट

या अलर्टमध्ये मध्यम पाऊस आणि वादळ अपेक्षित आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक काळजी घ्यावी, उदा. छत्री आणि योग्य कपडे वापरावे.

Weather Alert | Freepik

कोणती काळजी घ्यावी?

या अलर्टमध्ये नागरिकांना संभाव्य धोक्यांसाठी तयार राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.

Weather Alert | Freepik

खबरदारी

पाऊस आणि वादळामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.

Weather Alert | Freepik

हवामान अपडेट्स

नियमितपणे हवामान विभागाच्या वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे हवामानाची माहिती मिळवा.

Weather Alert | Freepik

विजेपासून सावधगिरी

विजेचा धक्का किंवा शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी उपकरणे बंद ठेवा.

Weather Alert | Freepik

आपत्कालीन संपर्क

आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे नंबर सेव्ह ठेवा.

Weather Alert | Freepik

NEXT: ऋतू बदलताना सर्दी, ताप टाळायचा आहे? मग ‘हे’ ५ काढे रोज प्या! आजारांपासून सुरक्षित राहा

येथे क्लिक करा