
महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून पावसानं ठिय्या मांडला असतानाच, हवामान खात्यानं पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशसह उत्तर-पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारतात पुढील सात दिवस, पूर्व भारतात ७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेशात ५ जुलै, हिमाचल प्रदेशात ७ जुलै आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ६ आणि ७ जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पूर्व आणि मध्य भारतात ५ ते ११ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, विदर्भ, छत्तीसगडमध्ये ५ ते ८ जुलै, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीममध्ये ५ आणि ८ ते १० जुलै, अंदमान आणि निकोबारमध्ये ६ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्ये ५ ते ७ जुलै, महाराष्ट्रातील विदर्भात ७ ते ८ जुलै रोजी, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, ओडिशात ५ आणि ६ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, पूर्व राजस्थानमध्ये ५ ते ११ जुलै, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, राजस्थानच्या पश्चिम विभागात ५, ६ जुलै आणि १० ते ११ जुलै रोजी हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेशात, तर ५ ते ९ जुलै रोजी जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशातील विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
७ ते ८ जुलै रोजी हिमाचल प्रदेश, ५ ते ७ जुलै रोजी उत्तराखंड, ६ आणि ७ जुलै रोजी पंजाब, हरियाणामध्ये, ५ आणि ९ ते १० जुलै रोजी राजस्थानच्या पूर्व भागात अतिमुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, गुजरातमध्ये, तर ५ ते ७ जुलै रोजी सौराष्ट्र, कच्छमध्ये विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
६ ते ७ जुलै रोजी मराठवाडामध्ये मुसळधार पाऊस कोसळेल. इशान्य भारतात पुढील सात दिवस अधिकांश भागांत विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मेघालयात ५ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.