'भारतरत्ना'ला सलाम! एपीजे अब्दुल कलाम यांच्या ८ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, IIM शिलाँगची अनोखी आदरांजली

IIM Shillong Pays Unique Tribute to Dr. Kalam: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी याच संस्थेत 'आपला ग्रह अधिक राहण्यायोग्य कसा बनवावा' (How to Make Our Planet More Liveable) या विषयावर आपले अखेरचे व्याख्यान दिले होते.
IIM Shillong Pays Unique Tribute to Dr. Kala
IIM Shillong unveils 8-foot bronze statue of APJ Abdul Kalamsaam tv
Published On

शिलॉग येथील आयआयएम संस्थेत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ८ फुटी कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची आज ११ वी पुण्यतिथी आहे. डॉ. कलाम यांच्या पुतळ्याचं अनावरण करत IIM संस्थेनं माजी राष्ट्रपतींना आदरांजली वाहिली. डॉ. कलाम यांनी याच संस्थेत 'आपला ग्रह अधिक राहण्यायोग्य कसा बनवावा' या विषयावर आपले अखेरचे व्याख्यान दिले होते.

IIM Shillong Pays Unique Tribute to Dr. Kala
Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा हे मी मोदींना सांगितलं होतं: शरद पवार

डॉ. कलाम यांच्या दूरदर्शी विचारांना आणि मूल्यांना अभिवादन करण्यासाठी IIM शिलाँगच्या सदस्यांनी पुतळ्याला पुष्पार्पण करत पुण्यतिथीच्या कार्यक्रमाची सांगता केली. IIM शिलाँगसोबत डॉ. कलाम यांची असलेलं नातं घनिष्ठ होतं. यामुळे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा ८ फूट उंच कांस्य पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. IIM शिलाँगच्या 'बोर्ड ऑफ गव्हर्नर्स'चे (BoG) अध्यक्ष शिशिर कुमार बाजोरिया यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले.

यावेळी BoG चे सदस्य अतुल कुलकर्णी आणि नितीन शर्मा, आयआयएम शिलाँगचे संचालक प्रा. (डॉ.) अरुण मोहन शेरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO) कर्नल दिनेश अधिकारी (निवृत्त) तसेच संस्थेचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

IIM Shillong Pays Unique Tribute to Dr. Kala
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा व्हिडिओ! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

८ फूट उंचं, ३.२५ फूट रुंदी आणि ३.५ फूट खोली असलेली ही मूर्ती, देशासाठी डॉ. कलाम यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे आणि शिक्षण, नाविन्य व वैज्ञानिक प्रगती त्यांनी आयुष्यभर वाहिलेल्या निष्ठेचे प्रतीक म्हणून उभी करण्यात आलीय. आयआयएम शिलाँग येथील विद्यार्थ्यांशी झालेल्या त्यांच्या शेवटच्या संवादप्रसंगी डॉ. कलाम यांनी "आपला ग्रह अधिक राहण्यायोग्य कसा बनवावा" या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले होते.

आपल्या व्याख्यानात त्यांनी नाविन्यपूर्णता, पर्यावरणविषयक जाणीव, नैतिक नेतृत्व आणि जबाबदार कृती यांच्या माध्यमातून शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सरकार, संस्था, वैज्ञानिक, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती युवावर्ग यांची सामूहिक जबाबदारी असावी याच्यावर त्यांनी भर दिला होता.

संस्थेत दिलेल्या आपल्या अंतिम व्याख्यानात कलाम यांनी "आपला ग्रह अधिक राहण्यायोग्य कसा बनवावा" हा आजही एक मार्गदर्शक विचार ठरलाय. हा विचार भावी पिढ्यांना उद्देशपूर्ण स्वप्ने पाहण्यास, सचोटीने नेतृत्व करण्यास आणि अधिक शाश्वत, शांततापूर्ण व सर्वसमावेशक जग घडवण्यात योगदान देण्यास प्रेरित करतो.

दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये माजी राष्ट्रपती 'कलाम सर' म्हणून ओळखले जात. डॉ. कलाम हे त्यांच्या नम्रता, संवेदनशीलता, प्रज्ञा आणि शिक्षणाप्रती असलेल्या अटळ निष्ठेमुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा देतात. आयआयएम (IIM) शिलाँगच्या विद्यार्थ्यांशी झालेला त्यांचा संवाद हा त्या संस्थेच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण होता. तरुण मनांच्या परिवर्तनशील शक्तीवर असलेल्या त्यांच्या विश्वासाचा एक उत्तम साक्ष देणार आहे.

सुजाण नेतृत्व घडवण्याच्या आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेप्रती आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करत आयआयएम शिलाँग शिक्षण, संशोधन, नाविन्यपूर्णता, शाश्वतता आणि नैतिक नेतृत्व या क्षेत्रांत उत्कृष्टतेचा प्रवास अविरतपणे पुढे नेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com