
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये क्रू मेंबर नगनथोई शर्माचा दुर्दैवी मृत्यू झाला. मूळची मणिपूरची असणाऱ्या नगनथोईच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. विमान दुर्घटना होण्यापूर्वी नगनथोईचे कुटुंबीयांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं. तिने घरच्यांना मेसेज करून मी लंडनला जात आहे, असे सांगितले होते. नगनथोईच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
विमान उड्डाण घेण्यापूर्वी नयथोईने कुटुंबीयांना मेसेज केला होता. तिने मेसेज करून सांगितले होते की, 'मी लंडनला जात आहे, काही मिनिटांत विमान उड्डाण करेल, आपण कदाचित काही वेळ बोलू शकणार नाही.' मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील नगनथोईचे हे शेवटचे शब्द तिच्या कुटुंबीयांच्या मनाला चटका लावून देणारे ठरले आहे. गुरुवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला.
विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये नगनथोईचा देखील समावेश आहे. ती केबिन क्रू ड्युटीवर होती. २४ वर्षीय नगनथोई शर्मा ही थौबल अवांग लाईकाई येथील रहिवासी होती. ती गेल्या दीड वर्षांपासून एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होती. नगनथोईला दोन बहिणी आहेत. विमान उड्डाण घेण्याच्या आधी तिने सकाळी ११:३८ वाजता तिच्या मोठ्या बहिणीला मेसेज केला होता. हा मेसेज शेवटचा असेल असं तिच्या कुटुंबीयांना क्षणभरही वाटले नाही.
दरम्यान, नगनथोईचे लहानपणापासून एअर होस्टेस होण्याचे स्वप्न होते. तिने स्वतः प्रशिक्षण घेतले. मुलाखत उत्तीर्ण झाली आणि नोकरी मिळवली. गेल्या एका वर्षापासून ती सतत आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होती. लंडनला जाणारी ही विमानसेवा तिच्यासाठी एक उत्कृष्ट कामगिरी होती. पण नशिबाने काहीतरी वेगळेच लिहिले होते आणि लंडनला जाण्यापूर्वीच तिचा अपघातामध्ये मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.