Shocking: घटस्फोटाचं विचित्र प्रकरण; पतीने घटस्फोट घेताना सेंटलमेंट म्हणून पत्नीकडे मागितली किडनी, नक्की काय आहे घटना?

Husband Wife Divorce: घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर येत आहे. पतीने घटस्फोट घेताना सेंटलमेंट म्हणून चक्क किडनी मागितली आहे, नक्की हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊ या.
Husband Wife Divorce
Husband Wife DivorceSaam Tv
Published On

Husband Wife Divorce News

घटस्फोटाची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. पण आता सध्या एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. घटस्फोट घेताना सहसा पती किंवा पत्नी सेटलमेंट म्हणून पैसे (Husband Wife Divorce) मागतात. परंतु हे प्रकरण थोडं वेगळं आहे. या प्रकरणात घटस्फोट घेताना सेंटलमेंट म्हणून चक्क किडनी मागितली आहे. नक्की हे प्रकरण काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Tajya Batmya)

डॉ. रिचर्ड बॅटिस्टा नावाच्या व्यक्तीने पत्नीपासून विभक्त होताना किडनी मागितली आहे. आता त्याने किडनी ( Kidney) का मागितली, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. डॉ. रिचर्ड बॅटिस्टा यांनी 1990 मध्ये त्यांनी पत्नी डोनेलशी लग्न केलं होतं. त्यांना तीन मुले आहेत. डोनेलने घटस्फोटाचा खटला (Divorce Case) दाखल केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सेंटलमेंट म्हणून किडनी मागितली

डोनेल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तेव्हा डॉ. रिचर्ड बॅटिस्टा यांनी त्यांची एक किनडी त्यांच्या पत्नीला दान केली होती. ही घटना 2009 साली घडली होती. मात्र डोनेल नेहमीच आजारी असल्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यांनंतर डोनेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाची केस दाखल (Divorce Settlement) केली. ही घटना अमेरिकेतील आहे.

आज तकच्या वृत्तानुसार 2001 मध्ये डॉ. रिचर्ड बॅटिस्टाने पत्नीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पत्नीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. पत्नीचा जीव वाचवणं, ही आपली पहिली प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण अवघ्या चार वर्षांनी त्यांची पत्नी डोनेलने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. यामुळे बॅटिस्टा खूप निराश झाला. त्याने किडनी परत कर, नाहीतर पैसे द्या अशी मागणी (Husband Wife Divorce News) केली होती.

Husband Wife Divorce
Divorce case: लग्नापूर्वी असलेला आजार लपवणं हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण

न्यायालयाने मागणी फेटाळली

अशा स्थितीत किडनी परत करणे शक्य नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, डोनेलला त्याची किडनी परत करण्यासाठी दुसरं ऑपरेशन करावं लागेल. त्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे किडनी परत देता येत नाही. आता ती किडनी डोनेलची झाली आहे, असं त्यांनी म्हटलं (Divorce News) आहे.

या प्रकरणात डॉ. बॅटिस्टा यांची एकही मागणी पूर्ण झाली नाही. नासाऊ काउंटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली आहे. न्यायालयाने दहा पानी निकाल दिला. मॅट्रिमोनिअल रेफरी जेफ्री ग्रोब म्हणाले, प्रतिवादीची नुकसानभरपाई आणि किडनीची मागणी कायद्याच्या विरोधात आहे.

Husband Wife Divorce
Divorced: नवरा आंघोळ करत नाही, आठवड्यातून एक-दोनदाच दात घासतो म्हणून बायकोने घेतला घटस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com