Divorce case: लग्नापूर्वी असलेला आजार लपवणं हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण

Mumbai High Court: लग्नापूर्वी असलेला असाध्य आजार लपून ठेवणं हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं, असं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
Mumbai High Court on Divorce case
Mumbai High Court on Divorce case Saam TV
Published On

Mumbai High Court on Divorce case

लग्नापूर्वी असलेला असाध्य आजार लपून ठेवणं हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं, असं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. मुलगा किंवा मुलीला काही असाध्य आजार असल्यास त्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी एकमेकांना माहिती द्यायला हवी, असंही खंडपीठाने निकाल देताना म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai High Court on Divorce case
Political News: वर्षा बंगल्यावर रंगली महायुतीची खलबतं; शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये मध्यरात्री चर्चा, काय निर्णय झाला?

काय आहे प्रकरण?

हायकोर्टात घटस्फोटाची याचिका करणाऱ्या तरुणाचे १८ मे २०१७ रोजी अकोल्यातील एका तरुणीसोबत लग्न झाले होते. लग्नापूर्वीच तरुणीला डोळ्यांचा आजार होता. तिने याची माहिती लपवून ठेवत तरुणासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

त्यामुळे लग्नाच्या ३ महिन्यांनंतरच पतीने-पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. यादरम्यान, वैवाहिक हक्क बहाल करण्यासाठी तिने अकोला कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली.

दुसरीकडे, माझ्या पत्नीला लग्नापूर्वीच आजार असून तिने याची माहिती माझ्यापासून लपवून ठेवली, असं म्हणत पतीने देखील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. अकोला कौटुंबिक न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने पतीचा अर्ज मंजूर करत पत्नीची याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरोधात पत्नीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणावरील सुनावणीत न्यायालयाने सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत अकोला कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

खंडपीठाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करत पत्नीची याचिका फेटाळून लावली. जर मुलगा किंवा मुलीगी लग्नापूर्वी कोणत्याही असाध्य आजाराने ग्रस्त असेल आणि त्यांना याची जाणीव असेल, तर त्यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडताना याची माहिती जोडीदाराला दिली पाहिजे, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं.

Mumbai High Court on Divorce case
Weather Alert: महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अन् गारपीटीची शक्यता; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com