Agra Crime: मेकअप किट वापरल्याने सासू-सुनेत कडाक्याचं भांडण; पतीकडे थेट घटस्फोट मागितला

Mother in law using daughter in law make up: सासू-सुनेच्या भांडणानंतर पतीने पत्नीला आणि तिच्या बहिणीला घरातून बाहेर काढले आहे. गेल्या २ महिन्यांपासून या दोघीही त्यांच्या माहेरी राहत आहेत.
Agra Crime
Agra CrimeSaam TV

Agra Crime:

महिलांवरील अन्याय अत्याचाऱ्याच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये सासू-सुनेची कडाक्याची भांडणं होत असतात. या भांडणांमध्ये घरातील सूनेला थेट घराबाहेर देखील काढले जाते. अशात आग्रामधून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सासूने सुनेचा मेकअप किट वापरल्यानंतर सुनेनं स्वत: आपल्या पतीकडे घटस्फोट मागितला आहे.

Agra Crime
Mumbai-Agra Highway Accident: धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, 13 जणांचा मृत्यू; 20 ते 25 जण जखमी

संपूर्ण प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी महिला आणि तिची बहिण या दोघींचा मलपूरा येथे राहणाऱ्या कुंटुंबातील दोन भावांसह विवाह झाला. सासू-सुनेच्या भांडणानंतर पतीने पत्नीला आणि तिच्या बहिणीला घरातून बाहेर काढले आहे. गेल्या २ महिन्यांपासून या दोघीही त्यांच्या माहेरी राहत आहेत. त्यामुळे आता महिला घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

महिलेने आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की, माझ्या सासू सतत माझ्याशी वाद घालतात. त्या बाहेर जाताना कधीही मेकअप करत नाहीत. मात्र त्या दिवशी त्या बाहेरही जाणार नव्हत्या तरी त्यांनी माझं मेकअपचं सामान वापरलं. त्या मेकअप करून घरातच बसल्या होत्या. त्यामुळे मला राग आला आणि मी त्यांना याबाबत विचारलं.

त्यांच्यात आणि माझ्यात मेकअप किटवरून वाद झाले. त्यानंतर त्यांनी पतीला माझ्याबदद्ल सांगितले. पतीने माझे काहीही न ऐकता आपल्या आईची बाजू घेतली. त्यानंतर माझ्यावर अत्याचार करत वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. तसेच मला आणि माझ्या बहिणीला घराबाहेर काढले. त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे, असं महिलेने आपली बाजू मांडताना म्हटलंय.

Agra Crime
Beed Crime News: अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग ; रोडरोमियोने बळजबरीनं कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com