आंघोळ करणं आणि स्वतःला स्वच्छ ठेवणं, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. उन्हाळ्यात अनेक लोकं दिवसातून दोन-तीन वेळा आंघोळ करतात. परंतु, थंडीत बरेचजण आंघोळ करणं टाळतात. बरेच लोकं 2-3 दिवस किंवा 4-5 दिवसांच्या अंतराने आंघोळ करतात. आंघोळ केली नाही म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर काय होईल, असा विचार कधी केलाय का? (Maharashtra News)
तुर्किये येथे अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेनं (wife) तिचा पती क्वचितच आंघोळ करतो, म्हणून त्याच्यावर खटला दाखल केला आहे. तिला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पतीपासून घटस्फोट मंजूर
आंघोळ करत नसल्यामुळे आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासल्यामुळं त्याचा घामाचा वास येतो, असा दावाही महिलेनं केलाय. या महिलेनं स्वच्छतेच्या अभावाचं कारण देत तिच्या पतीविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल (Wife Files Divorced Husband) केलाय. महिलेच्या वकिलाने अंकारा येथील कौटुंबिक न्यायालयात सांगितलं की, तिच्या पतीने किमान 5 दिवस सलग तेच कपडे घातले होते. अंघोळ केली नव्हती. त्यामुळं त्याच्या शरीराला आणि कपड्यांमधून खूप घामाचा वास येत होता.
तिने पतीविरूद्ध केलेल्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी काही साक्षीदारांनाही न्यायालयात बोलावण्यात आलं होतं. यामध्ये तिच्या नवऱ्याला ओळखणारे, काही त्याच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांनी महिलेच्या पतीच्या (husband) अस्वच्छतेबद्दल सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट मंजूर केला. पत्नीला नुकसान भरपाई म्हणून 13 लाख 69 हजार देण्याचा आदेश दिला.
न्यायालयीन कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या साक्षीने असं दिसून आलं की, महिलेचा पती दर 7 ते 10 दिवसातून एकदाच आंघोळ करतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासतो. त्यामुळे श्वासोच्छवासाची दुर्गंधी आणि शरीराला दुर्गंधी येत (Wife Husband Divorced) होती. यामुळं महिलेचं जीवन कठीण झालं होतं, असं न्यायालयीन कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध झालंय.
या महिलेच्या वकिलाने सांगितले की, पती-पत्नीने संयुक्त जीवनाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. वर्तनामुळे सामायिक जीवन असह्य झाल्यास, दुसऱ्या पक्षाला घटस्फोटासाठी खटला दाखल करण्याचा अधिकार आहे. आपण सर्वांनी मानवी संबंधांमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. आपलं वर्तन आणि स्वच्छता या दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.