Shocking News: इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबत दिवसरात्र बोलायचा, भेटायला गेला तर निघाली बायको

Instagram Affair Backfires: इन्स्टाग्रामवरील गर्लफ्रेंडला भेटायला हॉटेलवर गेला पण ती समोर येताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण इन्स्टाग्रामवरील त्याची गर्लफ्रेंड ही दुसरी तिसरी कुणी नसून त्यांची बायकोच निकाली. नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यसाठी बायकोने फेक अकाऊंट बनवले होते.
Shocking News: इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबत दिवसरात्र बोलायचा, भेटायला गेला तर निघाली बायको
Instagram Affair BackfiresSaam Tv
Published On

विवाहित असताना देखील स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या तरुणाची पोलखोल त्याच्या बायकोनेच केली. बायकोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करून नवऱ्याशी मैत्री केली. इन्स्टावरील गर्लफ्रेंडला हा तरुण मोठ्या तोऱ्यात भेटायला गेला. पण हॉटेलवर पोहचताच त्याचे रंग उडाले. कारण इन्स्टावरील गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नसून त्याची बायकोच निघाली. बायकोच्या चतुराईने नवऱ्याचे खरं रूप सर्वांसमोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या ग्वालियर शहरामध्ये ही घटना घडली. माधौगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचे २०२३ मध्ये एका खासगी कंपनीमध्ये सेल्समनचे काम करणाऱ्या तरुणासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर हा तरुण मोबाइलवर तासंतास व्यस्त असायचा. सतत बाहेर जाऊन फोनवर गप्पा मारायचा. या कृत्यामुळे त्याच्या बायकोला संशय आला आणि तिने विचारपूस केली तर त्याने कंपनीचे फोन येत असल्याचे सांगितले.

Shocking News: इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबत दिवसरात्र बोलायचा, भेटायला गेला तर निघाली बायको
Shocking News: धर्मगुरूला भेटायला गेली, परत आलीच नाही; नागपूरमधील महिला बॉर्डर क्रॉस करून गेली पाकिस्तानात

मोबाइलला पासवर्ड ठेवणं, रात्री उशिरापर्यंत इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स्अपवर ऑनलाइन राहून चॅटिंग करणं, सतत घराबाहेर जाऊन फोनवर तासंतास गप्पा मारणं नवऱ्याच्या या कृत्यामुळे महिला खूपच वैतागली होती. आपल्या नवऱ्याचं चाललंय तरी काय हे उघड करण्यासाठी या महिलेने आपल्या बहिणीच्या आयडीचा वापर करून एक सिमकार्ड खरेदी केले. तिने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आणि एका सुंदर मुलीचा फोटो डीपीला ठेवला. तिने याच आयडीवरून आपल्या नवऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिच्या नवऱ्याने ही रिक्वेस्ट लगेच अॅक्सेप्ट देखील केली.

Shocking News: इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबत दिवसरात्र बोलायचा, भेटायला गेला तर निघाली बायको
Shocking news : सासरा ३ मुलांची आई असलेल्या सुनेला घेऊन पळाला; नवऱ्याने केली मोठी घोषणा, शोधणाऱ्याला २०००० रुपये देणार

या महिलेचा नवरा तिच्यासोबत इन्स्टाग्रामवर तासंतास गप्पा मारू लागला. जवळपास दोन महिने दोघे एकमेकांसोबत इन्स्टाग्रामवर गप्पा मारायचे. नवऱ्याला संशय येऊ नये यासाठी ही महिला जेव्हा जेव्हा त्याच्याशी बोलायची गरज पडायची तेव्हा ती तिच्या बहिणीला व्हॉइस कॉलवर बोलायला लावायची. इन्स्टाग्रामवर या महिलेचा नवरा तिच्यासोबत गर्लफ्रेंड असल्यासारखं बोलायचा. शेवटी या तरुणाच्या पत्नीने त्याला आपण भेटूया असे विचारले तर त्यावर तिचा नवरा लगेच हो बोलला. एका हॉटेलवर भेटायचं ठरलं. या महिलेचा नवरा इन्स्टावरील गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मोठ्या तोऱ्यात हॉटेलवर गेला खरा पण तिथे आपल्या बायकोला पाहून त्याला धक्का बसला.

Shocking News: इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबत दिवसरात्र बोलायचा, भेटायला गेला तर निघाली बायको
Shocking News: शेतात पेरणीची तयारी करण्यासाठी गेली, पण तिथेच काळानं गाठलं, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं?

हॉटेलमध्ये पाहून महिलेचा नवरा तिला सांगत होता की मी एका क्लाइंटला भेटायला आलो आहे. पण शेवटची त्याच्या बायकोने मोबाइलमधील इन्स्टाग्रावरील मेसेज दाखवले आणि त्याचा खोटारडेपणा उघड झाला. तिने नवऱ्याला सांगितले की तू इन्स्टाग्रावर ज्या मुलीसोबत बोलतो ती दुसरी तिसरी कुणी नाही तर मीच आहे. त्यानंतर हॉटेलमध्ये दोघांचे भांडण झाले आणि हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले. महिलेने नवऱ्याविरोधात फसवणुकीचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली. तर तरुणाने आपल्या बायकोवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहेत.

Shocking News: इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबत दिवसरात्र बोलायचा, भेटायला गेला तर निघाली बायको
Shocking News : रस्त्याच्या कडेला पडलेल्या चिमुकलीला दिलं नवं आयुष्य, तिनेच घेतला आईचा जीव; Instagramमुळे बिंग फुटलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com