अयोध्येत आज राम मंदिराचं लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राम मंदिरात राममूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज सोमवारी २२ जानेवारीला सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणार नाही. मात्र, २३ जानेवारीपासून अयोध्येतील राम मंदिर सर्वांसाठी खुलं होणार आहे. या विशेष सोहळ्यासाठी देशभरातील प्रतिष्ठित लोकांनी हजेरी लावली. उद्या मंगळवारपासून सर्वांसाठी मंदिर खुले होणार असल्याने मंदिरस्थळी एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
अयोध्येत २३ जानेवारीपासून सकाळी सात ते ११.३० वाजेपर्यंत दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. मंदिरात दिवासाला दोन वेळा आरती केली जाणार आहे. या राम मंदिरात सकाळी ६.३० वाजता श्रृंगार आरती होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता आरती होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मंदिराच्या आरतीत सामील होण्यासाठी विशेष पास लागणार आहे. आरतीत सामील होण्याचा पास हा मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. मंदिरात सामान्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी कोणत्याही पासची गरज नाही.
आरतीच्या पाससाठी तुम्हाला वेबसाइटवर मोबाइल क्रमांक नोंद करावा लागेल. तुम्ही मोबाईल क्रमांक नोंद केल्यानंतर ओटीपी येईल. त्यानंतर तुम्ही योग्य ती माहिती दिल्यानंतर पास डाउनलोड करू शकता.
तुम्हाला आरतीसाठी विशेष पास हा ऑफलाइन पद्धतीने मिळू शकतो. तसेच अधिकृत ओळखपत्राची गरज भासेल. एका आरतीत केवळ ३० जण उपस्थितीत राहू शकतात. जे आरतीच्या पाससाठी प्रथम अर्ज करतील, त्यांनाच आरतीत सहभागी होता येईल. आरतीसाठी पास मिळाल्यानंतर अर्धा तास आधी मंदिरात उपस्थित राहावे लागले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.