Major Accident : काम करून घरी परतताना मजुरांवर काळाचा घाला; भरधाव ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

patna accident News : काम करून घरी परतताना मजुरांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात ७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने मजुरांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
patna accident
patna accident Newsai generated
Published On

Patna accident : बिहारची राजधानी पटनामध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक आणि रिक्षाच भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ७ मजुरांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

patna accident
Car Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना चालकाला डुलकी; बॅरिकेटला धडकून कार उलटली

कामावरून घरी परतताना रिक्षातील मजुरांचा अपघात झाल्याची घटना घडली. पटना येथील मसौढी-नौबतपूर मार्गावरील धनीचक वळणावर रविवारी सांयकाळी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेल्या मजुरांची ओळख पटली आहे. मतेंद्र बिंद (२५), उमेश बिंद (३८), विनय बिंद (३०), रमेश बिंद (५२), सूरज ठाकूर (२०), उमेश बिंद (३०), रिक्षाचालक सुशीलकुमार (३५) यांच्या नावाचा समावेश आहे. तर ६ मजूर डोरीपार येथे राहणारे आहेत. तर सुशीलकुमार हा हंसाडीह गावात राहायला होता.

patna accident
Accident : पाहुण्यांकडे जाताना काळाचा घाला, बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, ६ मजूर काम करून घरी जाण्यासाठी रिक्षाने निघाले होते. दोन्ही वाहनांचा रस्त्याच्या किनाऱ्यावरील एका खड्ड्याजवळ अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, जेसीबीच्या मदतीने वाहनांना बाजूला काढण्यात आलं. अपघातानंतर ढिगाऱ्यातून मृतदेह बाजूला काढून ताब्यात घेण्यात आले. मढौरी पोलीस ठाण्याचे एसएचओ विजय यादवेंदू यांनी सांगितलं की, 'चालकाने ट्रकवरील नियंत्रण गमावल्यानंतर अपघात झाला'. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

patna accident
Jalgaon Accident : दुचाकींची समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पतीसह मुलगी जखमी

रिक्षामध्ये एकूण किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघाताविषयी प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना अपघाताविषयी माहिती दिली. अपघातानंतर मजुरांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. मजुरांचे मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मृतकांच्या नातेवाईकांनी सरकारकडे १०-१० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com