
कर्नाटकामधील अनंतपूर ते डफळापूर मार्गावरील सीमेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झाले आहेत. जत तालुक्यातील मेंढिगिरी येथे ते राहत होते. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. रामू कुरणे (वय ५५) आणि मुलगी जान्हवी रामू कुरणे (वय १५) मेंढिगिरी येथे राहणाऱ्या या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघाती मृत्यूची नोंद कर्नाटकातील अथणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
रामू कुरणे हे आपल्या मुलीसह नातेवाईकांकडे शनिवारी मोटारसायकल वरून गेले होते. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास कर्नाटकामधील अनंतपूर हद्दीत त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की जागीच बाप-लेकीचा मृत्यू झाला. धडक देणाऱ्या वाहनचालकाने मात्र तेथून पळ काढला.
या दोघांना तातडीने उत्तरणीय तपासणीसाठी अथणीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी मेंढिगिरी गावी त्यांचा मृतदेह आणण्यात आला. सकाळी आठच्या सुमारास शोकाकूल वातावरणात बाप-लेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद अथणी पोलिस ठाण्यात झाली आहे. रामू कुरणे हे फोटोग्राफर होते. अचानक काळाने घात घातल्यामुळे बाप-लेकीचा मृत्यू झाला. अपघातामुळे मेंढिगिरी परिसरात शोककळा पसरली आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.