पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Latest Crime News: गुजरातमधील सुरत शहरात पत्नीवर संशय घेत पती व मित्रांनी केला सामूहिक बलात्कार; तापी नदीत फेकण्याचा प्रयत्न. कपोदरा पोलिसांनी काही तासांत चौघांनाही अटक केली.
Horrific Crime In Gujarat
Horrific Crime In GujaratSaam TV News
Published On
Summary
  • पत्नीवर संशय घेत पतीने मित्रांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केला.

  • महिलेच्या डोक्यावर पाईपने वार करून ती गंभीर जखमी करण्यात आली.

  • चौघांनी मिळून तिला तापी नदीत फेकण्याचा प्रयत्न केला.

  • पीडितेने स्वत:चा जीव वाचवून पोलिसात तक्रार दाखल केली; चारही आरोपी अटकेत.

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना गुजरातमधील सुरत शहरात घडली आहे. पत्नीवर असलेल्या अवैध संबंधाच्या संशयावरून पतीनं त्याच्या मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिचे हातपाय बांधून तापी नदीत फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास करत चारही आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Horrific Crime In Gujarat
Crime news: प्रायव्हेट पार्टला इजा अन् गळ्याला...; ५ वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार

ही संतापजनक घटना २४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. गणेश राजपूत असे आरोपीचे नाव आहे. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण होत. घटनेच्या दिवशी आरोपी गणेश राजपूतने आपल्या पत्नीला काठी आणि हातोड्यानं बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी, त्यानं त्याचा मित्र महेशसह महिलेला उचलून दीनदयाळ नगरमधील एका खोलीत नेलं.

Horrific Crime In Gujarat
Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; नक्की काय घडलं?

तिथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या डोक्यावर पाईपने वार करण्यात आले. यामुळे पीडित महिला गंभीर जखमी झाली. यानंतर गणेशने त्याचे इतर दोन मित्र विजय आणि अप्पा यांना बोलावून घेतलं. चौघांनी या महिलेला ऑटोमध्ये बसवून घेतलं. तसेच महिलेला तापी नदीवर घेऊन गेले आणि मारहाण केली.

त्यांनी मिळून दोरीने महिलेचे हातपाय बांधले. तिला नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला. महिलेनं यातून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिनं कपोदरा पोलीस स्टेशन गाठले. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी म्हणजेच तिच्या पतीवर पूर्वीपासून विविध गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत आरोपी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील असल्याची माहिती आहे.

Horrific Crime In Gujarat
धनंजय मुंडे नव्हे 'या' नेत्याची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री? एकनाथ शिंदेंनी घेतली भेट; कुणाचा पत्ता कट होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com